परभणी: राज्यात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात वसमत (Parbhani) तालुक्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचं दिसून येतं.

बाबाराव साखरे हे स्विफ्टडिझायर कार क्रमांक - एमएच38 एडी 3541या वाहनातून आरळयेथून परभणीच्या दिशेने येत असताना समोरून येत असलेली क्रेटा कार क्रमांक - एमएच22 बीसी 7888 च्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बाबारावदतराव साखरे, विमलबाईबालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) कांताबाईअंबादासकातोरे (रा. आरळ ता. वसमत) या तिघांचा घटनास्थळीचमुत्य झाला असून त्यांच्या सोबतचेसाईनाथरामचंद्र काकडे, हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनीपोलिसांनीघटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींनापरभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ताडकळसपोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सखारामसटवाजी साखरे रा. आरळ ता. वसमत यांच्या फिर्यादीवरून क्रेटा कार क्रमांक एमएच22 बीसी 7888 च्या चालकावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अनुच्छेद106(1), 281, 125(अ) आणि125() नुसारताडकळसपोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ताडकळसचेठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.

हेही वाचा

एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका