सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात पोलिसांची सुप्रीम कोर्टात धाव? नेमकं काय झालं?
संभाजीनगर खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाची सात दिवसांची मुदत संपली आहे . मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हे दाखल झाले नसून कोर्टाच्या आदेशाविरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात अपिल केल्याची माहिती आहे.

Parbhani: परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात संबंधित पोलिसांवर पुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात पोलिसांनी या थेट सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले होते. मात्र, न्यायालयाने दिलेल्या 7 दिवसांच्या मुदतीनंतरही अद्याप पुन्हा दाखल झालेला नाही. उलट पोलिसांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आता धाव घेतल्याची माहिती मिळाली . दरम्यान आम्ही आमचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवू .कोण पाठीशी घालता याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे .
नेमकं प्रकरण काय?
परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती .यामुळे संतप्त जमावाने परभणी जिल्हा बंदची हाक देत जाळपोळ व दगडफेक केली .या घटनांमध्ये परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली . यात कोठडीतच 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाला .नंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालातून शरीरावरील अनेक जखमांमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले .पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला .
दरम्यान याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिले होते .पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशांमुळे पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले गेले . संभाजीनगर खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाची सात दिवसांची मुदत संपली आहे . मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हे दाखल झाले नसून पोलिसांनी या निर्णयाविरोधातच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचं समोर येत आहे .
हेही वाचा


















