एक्स्प्लोर

Parbhani : चंद्रपूरचे उट्टे काँग्रेस परभणीत काढणार की भाजप काही खेळी करणार? सहलीवर गेलेले नगरसेवक आज परतणार

Parbhani Election News : परभणीत शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणार असून त्यासंबंधी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. 

परभणी : चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस सोबत न जाता भाजपला पाठिंबा दिल्याने त्याचे पडसाद परभणीत उमटतील का याचं उत्तर आता अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे. सहलीवर गेलेले काँग्रेसचे 10 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 22 नगरसेवक परभणीत परतणार आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होऊन महापौर आणि उपमहापौरपदाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 

चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळी भूमिका घेत भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसकडे सर्वाधिक जागा असतानाही त्यांचा महापौर होऊ शकला नाही. त्याचे परिणाम परभणीत पाहायला मिळतील अशी चर्चा सुरू आहे. परंतु, परभणीत आमची निवडणूकपूर्व युती असल्याचा दावा ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी केला.

बैठकीत महापौरपदाचं नाव ठरणार 

परभणीत आता खरोखरच काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की भाजप काही वेगळी खेळी करणार हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 22 आणि काँग्रेसचे 10 नगरसेवर हे सहलीवर गेले असून ते बुधवारी रात्री परभणीत उतरणार आहेत.

बुधवारी रात्री काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होणार असून त्यामध्ये महापौर आणि उपमहापौरपदाचा निर्णय होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून या बैठकीला माजी आमदार सुरेश देशमुख, काँग्रेसचे उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, शहराध्यक्ष नदीम इनामदार यांच्यासह गुलमिर खान उपस्थित असतील. तर ठाकरेंच्या सेनेकडून खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, गटनेते दिलीप ठाकूर उपस्थित असणार आहेत. ठाकेरेंच्या शिवसेनेकडून सहा जणांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. 

परभणी महापालिकेतील संख्याबळ: एकूण जागा 65

शिवसेना ठाकरे : 25
काँग्रेस : 12
भाजप : 12
राष्ट्रवादी काँग्रेस : 11
जनसुराज्य शक्ती : 3
यशवंत सेना : 1
इतर : 1

ठाकरेंकडून कुणाचे अर्ज?

दिलिप ठाकूर 
2. श्याम खोबे 
3. सौ. प्रतिभा अतुल सरोदे 
4. माजू लाला 
5. सय्यद इकबाल 
6. शाबुद्दिन सिद्दिकी 

उपमहापौर

श्याम खोबे 

काँग्रेसकडून महापौरपदासाठी कुणाचा अर्ज? 

भगवान वाघमारे 
2. गणेश देशमुख 
3. गुलमिर खान 

उपमहापौर 

भगवान वाघमारे 
2. गणेश देशमुख 
3. गुलमिर खान 

भाजपकडून महापौरपदासाठी अर्ज 

सौ. मीनाताई सुरेश वरपुडकर 
2. डॉ. केदार खटींग 
3. सौ. तिरुमला खिल्लारे 
4. रितेश झांबड 

भाजप उपमहापौर पदासाठी अर्ज 

सौ. तिरुमला खिल्लारे 
2. विश्वजीत बुधवंत

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 
Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 
Who is Ramrao Wadkute: राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
Parbhani : परभणी जिल्ह्यातील कोल्हावाडीत पहिली ‘बर्तन बँक’; प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने आदर्श पाऊल
परभणी जिल्ह्यातील कोल्हावाडीत पहिली ‘बर्तन बँक’; प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने आदर्श पाऊल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Embed widget