एक्स्प्लोर

Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde: परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे.

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठीच्या निवडीत भाजपने काँग्रेसला जोरात झटका दिला. भाजपने आपला महापौर निवडून आणल्याने काँग्रेसवरच टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवकांचं संख्याबळ असतानाही काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका बसल्याची टीका होत आहे. तर, या निवडणुकीनंतर परभणीच्या (Parbhani) महापौरपदासाठीच्या निवडीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विजयी झाला आहे. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम नगरसेवक सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना महापौरपदाची संधी मिळाल्याने भाजपसह (BJP) सत्ताधाऱ्यांकडून टीका करण्यात येत आहे. आता, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही या निवडीवरुन ठाकरेंना टोला लगावला. 

परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. महापौरपदावर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी बाजी मारली, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश देशमुख यांची निवड झाली आहे. मात्र,ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम महापौर बसवण्यात आल्याने भाजपसह सत्ताधाऱ्यांकडून टीका होत आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या आमदार चित्रा वाघ यांनीही ठाकरेंवर टीका केली. मुंबईत खानला महापौरपदी बसवण्याचे स्वप्न झाले भंग म्हणूनच परभणीला हिरवा रंग दिला का? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. तर, एकनाथ शिंदेंनीही बाळासाहेबांचे विचार सोडल्याचे सांगत टोला लगावला आहे. 

ठाकरेंच्या शिवसेनेनं परभणीत मुस्लिम नगरसेवकास महापौरपदाची संधी दिल्यावरुनही एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेबाचे विचार सोडल्यामुळे आम्हाला वेगळं जावं लागलं होत, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मात्र, परभणीमध्ये यांचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. 

सय्यद इकबाल यांना 39 मतं

परभणीत महाविकास आघाडीकडून महापौर निवडणुकीपूर्वीच सत्तासमीकरण स्पष्ट झाले होते. शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिवसेनेकडून सय्यद इकबाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, तर काँग्रेसने उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांचे नाव अधिकृत केले होते. महापौर निवडीसाठी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना व्हीप देखील बजावला होता. महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना 39 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना 26 मते मिळाली. त्यामुळे, महापौरपदासाठी स्पष्ट बहुमत मिळवत सय्यद इकबाल यांनी महापौरपद पटकावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अक्षय देशमुख आणि रजिया बेगम यांनी भाजपला मतदान केले नाही, ही बाबही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली.  

Parbhani Election Result 2026: परभणी महापालिकेतील संख्याबळ

एकूण जागा 65

शिवसेना ठाकरे : 25

काँग्रेस : 12

भाजप : 12

राष्ट्रवादी काँग्रेस : 11

जनसुराज्य शक्ती : 3

यशवंत सेना : 1

इतर : 1

हेही वाचा

महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget