परभणी : जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. 23 ऑक्टोबरच्या रात्री पाथरीतील पठाण मोहल्यात या दोन्ही गटांमध्ये चांगली झडप झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये आज 4 दिवसानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद खान, तारेख खान व इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटात दाखल झाल्याच्या रागातून दुर्राणी यांच्या मुलांनी मारहाण केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवकांनी केलाय. त्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात 307 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर, बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव जुनेद खान दुर्राणी यांच्या फिर्यादीवरून तुम्ही पठाण मोहल्यात जेवायला का आलात असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी त्यांचे दोन चिरंजीव व इतर जणांना शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक हासिब खान यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याने त्यांच्या विरोधात सुद्धा कलम 307 सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरीत तणावाचं वातावरण
मागील काही दिवसांपासून पाथरीत अजित पवार गटाचे नेते तथा आमदार बाबाजानी दुर्राणी आणि शिंदे गटाचे नेते तथा माजी नगरसेवक हासिब खान यांच्यातील वाद टोकाला पोहचले आहे. त्यानंतर हे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने सामने आल्याने पाथरीत तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. शिंदे गटात दाखल झाल्याच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आखेफ खान तहसीब खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्याचे दोन चिरंजीव आणि इतर 7 असे 11 जणांवर 307,324,323,504 आदी कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, तर जुनेद खान दुर्राणी यांच्या फिर्यादीवरून शिंदे गट शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह 10 ते 15 जणांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
पाथरीत अजित पवार गटाचे नेते तथा आमदार बाबाजानी दुर्राणी आणि शिंदे गटाचे नेते तथा माजी नगरसेवक हासिब खान यांच्यातील वादानंतर पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे. तसेच दोन्ही गटाच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील या घटनेची माहिती घेण्यात आल्या असून, पोलीस अधिकारी या प्रकरणात लक्ष देऊन आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: