वसई : गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरुची बीचवर फुटबॉल आणण्यासाठी समुद्रात गेलेला १५ वर्षीय अंकित गुप्ता बेपत्ता झाला, घटनेला ७२ तासांहून अधिक काळ उलटूनही (Vasai News) त्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. नायगावच्या रश्मी परिसरातील रहिवासी असलेला अंकित १४ सप्टेंबर रोजी मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी सुरुची बीचवर गेला होता. खेळताना फुटबॉल समुद्राच्या पाण्यात गेल्यानंतर तो तो आणण्यासाठी पाण्यात (Vasai News) उतरला. मात्र, भरतीच्या वेगवान प्रवाहात तो वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.(Vasai News)

Continues below advertisement

घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस, अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पथकांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. समुद्रकिनाऱ्यासह समुद्रातील संभाव्य भागात बोटींच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हवाई शोधमोहीमही राबवण्यात येत आहे. समुद्रातील बदलते प्रवाह, लाटांचा वेग आणि विस्तीर्ण शोधक्षेत्रामुळे बचाव पथकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, अंकितचा शोध लागावा यासाठी कुटुंबीयांकडून प्रशासनाकडे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.(Vasai News)

अंकित अचानक दिसेनासा झाल्याने त्याच्या मित्रांनी तातडीने आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस, स्थानिक अग्निशमन दल आणि भारतीय तटरक्षक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन संयुक्त बचावकार्य सुरू केले. समुद्रात बोटींच्या साह्याने तसेच तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे हवाई शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, सलग ७२ तास उलटूनही अंकितचा कोणताही सुगावा लागलेला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून अजूनही ही शोधमोहीम तीव्रतेने सुरू आहे. या घटनेमुळे सुरुची बीचवरील पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि जीवरक्षकांच्या अपुऱ्या व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.

Continues below advertisement

Vasai News:  १४ तारखेला सकाळी ५:५० वाजता अंकित घरातून निघाला...

अंकितचे काका धर्मेंद्र गुप्ता यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, अंकित हा नायगाव ईस्ट येथील 'रश्मी इंटरनॅशनल स्कूल'मध्ये ९वी इयत्तेत शिकतो. तो नक्षत्र ग्रीन, बिल्डिंग नंबर ७, नायगाव येथे राहतो. १४ तारखेला सकाळी ५:५० वाजता अंकित घरातून डॉन बॉस्को येथे फुटबॉल खेळायला जात असल्याचे सांगून निघाला होता. मित्रांच्या सांगण्यानुसार त्यांनी ओला (Ola) कॅब बुक केली आणि ते सुरची बीच (Surchi Beach) येथे गेले. मित्रांच्या दाव्यानुसार, खेळताना फुटबॉल आत गेला आणि तो काढण्यासाठी अंकित व त्याचे दोन साथीदार गेले. अंकित मोठा असल्याने पुढे गेला व त्याचा पाय घसरून तो पडला. १४ तारखेच्या सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास तो बेपत्ता झाला. घटनेला ७२ तासांहून अधिक काळ लोटला असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. कोस्टगार्डचे (Coast Guard) हेलिकॉप्टर सकाळी ८:०० वाजता आले होते आणि त्यांनी परिसर फिरून पाहिला, पण काहीही माहिती मिळालेली नाही, अशी माहिती देखील सांगितली.

Vasai News: आरडाओरड किंवा मदत मागितली नाही...

स्थानिकांनी आणि मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार, मुले वर्तुळ करून खेळत होती. अंकित खाली पडल्यानंतर त्याच्या सोबतच्या एकाही मित्राने त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड किंवा मदत मागितली नाही. स्थानिक मच्छिमारांच्या मते, जर त्यांना तातडीने कळवले असते तर त्यांनी लगेच त्याला वाचवले असते. पोलिसांनी सर्व मुलांची फक्त एकत्र (ग्रुपमध्ये) चौकशी केली आहे. प्रत्येक मुलाची वैयक्तिक आणि वेगळी चौकशी करावी, अशी धर्मेंद्र गुप्ता यांची मागणी आहे, कारण मुलांच्या दाव्यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. पोलिसांनी १४ तारखेला सकाळी १०:१५ वाजता माहिती दिल्यानंतर, धर्मेंद्र गुप्ता सतत घटनास्थळी उपस्थित राहून शोधावर लक्ष ठेवून आहेत.