Palghar Rain News: पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने (Palghar Rain Updates) थैमान घातलं असून सध्या अति मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी नाले ओसांडून वाहायला सुरुवात झाली आहे. तर काही नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली असून नदी काठावरील गावांमध्ये पाणीही शिरायला सुरुवात झाली आहे. मुंबई आमदाबाद राष्ट्रीय मार्गा शेजारून खानिवडे येथून वाहणारी तानसा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली असून आजूबाजूच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाले आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई तालुक्यातील पाचूरखा गावातील धोडडे पाडा परिसरात नदीच्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून जाणारा फ्रिज पकडण्यासाठी एका नागरिकाने जीव धोक्यात घालून नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Palghar Rain News)

राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप-(Mumbai Ahmedabad Highway)

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून याचा परिणाम आता राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबई-आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई येथे राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप आलं असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा व्हायला सुरुवात झाली आहे तर वाहन चालक ह्या पुरा मधून रस्ता काढत पुढे सरकत आहेत

एका नागरिकाने जीवाची पर्वा न करता थेट नदीत उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार- (Palghar Rain News)

वसई तालुक्यातील पाचूरखा गावातील धोडडे पाडा परिसरात डोंगरातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे नदीला अचानक पूर आला आणि काही क्षणातच पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. घरातील धान्य, फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याच्या वेगामुळे नदीवरील पुलाचे कठडे आणि संरक्षण भिंतीचाही काही भाग कोसळला आहे. याचदरम्यान, पुराच्या पाण्यात एक फ्रिज वाहून जात असताना तो मिळवण्यासाठी एका नागरिकाने जीवाची पर्वा न करता थेट नदीत उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे नागरिकांनी अशा प्रकारचे धाडस टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांनी शासनाकडे पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. 

संबंधित बातमी:

Devendra Fadnavis: मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; पावसाचा रेट अलर्ट, मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांनाही महत्त्वाचं आवाहन