Pakistan ISPR on Operation Sindoor : अखेर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेतला. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. दरम्यान, भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (Inter-Services Public Relations) च्या महासंचालकांनी प्रतिक्रिया देत हा हल्ला 'तात्पुरता आनंद' असल्याचे म्हटले आहे.
भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा कायमच्या दुःखाने घेतली जाईल
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terrorist Attack) भारताने दिलेला प्रतिसाद 'तात्पुरता आनंद' असल्याची प्रतिक्रिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे. त्यात ते पुढे म्हणाले की 'याचा बदला कायमस्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल.'ISPR च्या अधिकृत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, 'पाकिस्तान स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल' आणि भारताच्या हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, या हल्ल्याला 'अनुत्तरीत सोडले जाणार नाही'.
'भारताने तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद... पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत. सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत,' असे आयएसपीआरच्या निवेदनात पुढे म्हटले आहे. 'पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी त्याचे उत्तर देईल. ते अनुत्तरीत राहणार नाही. भारताच्या तात्पुरत्या आनंदाची जागा सततच्या दुःखाने घेतली जाईल,' असे त्यात म्हटले आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार
भारतीय सैन्याकडून हा हल्ला त्वरित आणि 'योग्य' प्रतिसाद होता. अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालय (एडीजी पीआय) ने एक्स वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "पुंछ-राजौरी परिसरातील भिंबर गली येथे गोळीबार करून पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैन्य योग्य पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देत आहे."
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर काही तासांतच सीमेपलीकडून गोळीबार झाला. भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले नियोजित आणि निर्देशित केले जात होते," असे संरक्षणमंत्र्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा