Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर (Jammu Kashmir) मधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला (Pahalgam Terror Attack) केला आहे. यात अनेक निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा संस्थांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. तपासात असे दिसून आले आहे की दहशतवाद्यांनी या हल्ल्याची संपूर्ण योजना आधीच तयार केली होती आणि त्यांचा उद्देश पर्यटन स्थळी गैर-काश्मिरींना लक्ष्य करणे होता.
सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, त्यांना पूर्वसूचना मिळाल्या होत्या की दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एका प्रमुख पर्यटन स्थळाला लक्ष्य करू शकतात. या माहितीमध्ये, दहशतवादी धार्मिक कारणास्तव कोणत्याही गैर-काश्मीरी नागरिकाला लक्ष्य करू शकतात, असा इशारा देखील देण्यात आला होता.
तपासात आली मोठी माहिती समोर
हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी परिसराची रेकी केल्याचेही तपासात समोर आले आहे. म्हणजे त्याने घटनास्थळाची पाहणी केली आणि हल्ल्याची संपूर्ण रणनीती ठरवली. एजन्सींचे म्हणणे आहे की दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) कडूनही मदत मिळाली, ज्यांनी त्यांना केवळ शस्त्रेच पुरवली नाहीत तर हल्ल्यासाठी लॉजिस्टिकल सपोर्ट देखील दिला. सुरक्षा संस्था हल्ल्याशी संबंधित सर्व माहितीची कसून चौकशी करत आहेत. या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.
दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू
या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक पर्यटक होते. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारताच्या दौऱ्यावर असताना आणि पर्यटन आणि ट्रेकिंग हंगाम जोर धरत असताना हा हल्ला झाला आहे. मात्र काश्मीर खोऱ्यात पूलावामा हल्ल्यानंतर या सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात असताना मृतांचा आकडा अधिक वाढण्याचीही शक्यता बाळावली आहे.
दहशतवादी हल्ल्याबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरनमध्ये घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. शिवाय ते पर्यटक आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, सशस्त्र दहशतवादी 'मिनी स्वित्झर्लंड' नावाच्या गवताळ प्रदेशात घुसले आणि त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या आणि पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार सुरू केला.
हे ही वाचा