नागपूरः जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सोमवारी होणारी बैठक वादळी होणार असल्याचे चिन्ह आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर विरोधकही आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात असून शिवसेना सदस्यही विरोधी बाकावर राहणार आहे. त्यामुळे स्थायी समितीची शेवटची सभा गाजणार असल्याची चिन्हे आहेत.


जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष 17 जुलैला पायउतार होतील. उपाध्यक्ष पदासाठी 16 जुलैला निवडणूक होत आहे. आरक्षण न निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. मागील सभेत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यातील काही मुद्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. निधी वाटपावर सदस्यांमध्ये खदखद आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजपच्या सदस्यांमध्ये उर्जा संचारली आहे.


वाचा Sharad Pawar : भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू, महाराष्ट्रानंतर आता गोव्यात प्रयोग; शरद पवारांचा आरोप


शिवसेनेचे एकमेव सदस्यही विरोधी बाकावर गेलेत. कॉंग्रेसमधील काही सदस्यांना पदाची अपेक्षा आहे. पक्षाकडून पद मिळण्याचे संकेत न मिळाल्यास त्यांच्याकडून बंडखोरी होण्याची चर्चा आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेने तसेच अपेक्षा बाळगून असलेल्या सदस्यांमध्ये भेटीगाठी वाढल्याने सूत्रांकडून सांगण्यात येते. राज्यात बदललेले समीकरण व जिल्हा परिषदेत बदल घडविण्याचा होत असलेला प्रयत्नाचा प्रत्यक्ष परिणाम सोमवारच्या बैठकीत उमटण्याचे संकेत आहे. नुकतेच एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हकालपट्टीचे पत्र गाजत आहे. शिवाय लघुसिंचन विभागाकडून होत असल्याने अनियमितताही विरोधकांच्या अजेंड्यावर राहणार असल्याचे सांगण्यात येते.


विद्यार्थी गणवेश, शिक्षकांच्या सुट्याही गाजणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीची भूमिकाही तटस्थ राहण्यासाठी शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांमधील एका गटासोबत पदाची अपेक्षा असलेल्यांकडून चाचपणी होत आहे. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांचे विभाग विरोधकांच्या रडावरून दूर राहणार असल्याचे समजते. ही शेवटची बैठक असल्याने समजते. ही शेवटची बैठक असल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याचे संकेत आहे.


वाचाः Sri Lanka Crisis: श्रीलंकेत मोठं राजकीय -आर्थिक संकट, 'या' देशांनी पुढे केला मदतीचा हात