Online Gaming Bill passed in Rajya Sabha: लोकसभेनंतर राज्यसभेतही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी ऑनलाइन गेमिंग विधेयक मांडण्यात आले. हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. दरम्यान या विधेयकामुळे ड्रीम-11 (Dream 11), रमी, पोकरसारखे ऑनलाईन गेमही बंद होण्याची शक्यता आहे. ड्रीम-11 सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रयोजक आहे. पैशांचा समावेश असलेल्या ऑनलाईन गेमिंगमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतंय. ऑनलाईन गेमिंगमुळे काहींनी आत्महत्या केल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.
दरम्यान, या विधेयकाच्या आगमनाने बॉलिवूड स्टार्स आणि आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. किंबहुना, यामुळे रिअल मनी फॉरमॅटमध्ये डिझाइन केलेले अनेक भारतीय अॅप्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म देखील आहेत. हे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झाले आहे.
रणबीर, धोनी, शुभमनसह अनेक दिग्गजांना फटका
दुसरीकडे या नव्या ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे आता ऑनलाइन गेमिंग उद्योगात जाहिरातींवरील खर्चाला कात्री लागली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. हा खर्च जवळ जवळ 2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 17. 46 हजार कोटी रुपये इतका आहे. तसेच या विधेयकामुळे बॉलिवूड अभिनेते आणि क्रीडा क्षेत्रातील मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे. कारण जाहिरातींवर होणार खर्च आणि त्यांची वेळ मर्यादा लक्ष्यात घेता हा मोठा आर्थिक फटका असल्याचे बोललं जात आहे.
कारण आतापर्यंत ड्रीम11, मोबाइल प्रीमियर लीग, विनझो आणि रमीसर्कल सारख्या अनेक फॅन्टसी क्रिकेट गेमिंग प्लॅटफॉर्मनी भरपूर पैसे गुंतवले आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर आणि आमिर खान ड्रीम11 शी संबंधित आहेत. तर क्रीडा क्षेत्रातील एसएम धोनी विन्झोसाठी जाहिरात करतो. तसेच शुभमन गिल आणि माजी कर्णधार सौरव गांगुली गेम्स 24x7 च्या माय11सर्कलची जाहिरात करतात. तर दुसरीकडे ड्रीम11 चा BCCI सोबतचा तीन वर्षांचा प्रायोजकत्व करार देखील या नव्या विधेयकामुळे धोक्यात आला असल्याचे बोललं जात आहे.
आपापले पैसे काढून घ्या..., ड्रीम 11 कडून आवाहन
संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच आता ड्रीम-11 ने देखील मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला आहे. तसेच ड्रीम-11 ॲप वापरणाऱ्या सर्वांनीचं आपापले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आलं आहे. तुमच्या खात्यातील पैसे कुठेही जाणार नाहीत. ते सुरक्षित आहेत. तसेच तुम्हाला ड्रीम-11 ॲपमधून ते काढून घेता येतील, असेही या कंपनीने सांगितले आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तथापि, यामुळे, रिअल मनी फॉरमॅटमध्ये डिझाइन केलेले अनेक भारतीय अॅप्स आणि गेमिंग प्लॅटफॉर्म देखील आहेत.
संबंधित बातमी: