Onion Farmers नाशिक: केंद्र सरकारच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार असल्याची चिन्ह आहे. करण निर्यात प्रोत्साहन योजने अंतर्गत कांद्या निर्यात दारांना मिळणारी 1.9 टक्के परताव्याची सवलत सरकारने बंद केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे निर्यातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊन कांदाची मागणी कमी होण्याची शक्यताही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा पीक असल्यानं बाजार भाव कोसळत आहेत. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकाऱ्यांकडून केली जात आहे. 

....अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार: भारत दिघोळे 

दरम्यान, मोदी सरकारच्या  या निर्णयामुळे कांदा उत्पादकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने निर्यात प्रोत्साहन अनुदान रद्दचा निर्णय मागे घ्यावा. तसेच  10% निर्यात प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाणार, असा इशारा ही दिघोळे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात कांदा प्रश्न अधिक चिघळतो की त्यावर सरकार कडून काही तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली जातेय- राजू शेट्टी

नाशिक जिल्ह्यात 6 मे पासून सातत्याने 3 आठवडे पाऊस झाला आहे. शेतकऱ्याचे यात मोठं नुकसान झाले आहे. द्राक्षाची गर्भधारणा होणे अशक्य आहे. तसेच डाळींब बाबतीत तसेच आहे. पावसाने चाळीतील कांदा खराब झाला आहेच सोबतच शेतात असलेला कांदाही  वाहून गेला आहे. भाजीपाल्याची ही  तीच अवस्था असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.

कृषिमंत्री नाशिक जिल्ह्यातील असताना ही त्यांनी आपलं बेजबाबदार वक्तव्य करणे बंद केले नाही. पंचनामा कसला करावा? असे प्रश्न ते विचारात आहेत, शेतकऱ्यांशी तुलना भिकारीशी केली जात आहे. अजित पवार म्हणतात मनातले बोलायचे नसतं, त्यामुळे अजित पवारांच्या मनात तेच आहे. असा टोला ही त्यांनी लगावला आहे. 

टोमॅटो आणि कांद्याची आवक वाढली 

नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो आणि कांद्याची आवक येत असते. दरम्यान, वापाऱ्यांनी टोमॅटोची खरेदी करुन देखील पैसे दिले नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना टोमॅटोची खरेदी केली होती. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांची तब्बल अडीच कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, आंदोलन सुरु झाल्यावर व्यापारी काही निर्णय घेतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या