Accident News : राज्यभरात आज महाशिवरात्री (MahaShivratri 2025) निमित्य सर्व शिवमंदिर आणि तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. तर राज्यभरात अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असताना विदर्भात वेगवेगळ्या दोन दुर्घटनेच्या घटना घडल्या आहेत. यात पहिल्या घटनेत गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून वाहणार्‍या वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.      

Continues below advertisement


मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकांचा मृत्यू 


यातील पहिल्या घटनेत गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना आज(26 फेब्रुवारी) बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. अभिषेक मेश्राम (रा. चंद्रपूर) असे मृतक भाविकाचे नाव आहे. मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला सुरवात झाली असून यात्रेनिमित्त अनेक जण वैनगंगा नदीत स्नान करून मार्कंडेश्वराचे दर्शन घेत असतात. अशातच 5 युवा भाविक नदीत अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले असल्याची घटना घडली आहे. यातील चार भाविक पाण्यातून बाहेर पडले तर एकाचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झालाय. दरम्यान ही घटना घडली त्यावेळी एसडीआरएफचे 5 बचाव पथक नदीत तैनात होते. मात्र बुडालेला भाविक हा मंदिरापासून फार लांब अंतरावर असल्याने आणि त्याबाबत कुठलीही कल्पना नसताना ही घटना घडली असल्याने त्याला वाचवू शकले नाही. दरम्यान या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा मृत्यू 


दरम्यान, अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे घडली आहे. यात 3 युवकांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.वर्धा नदीच्या चुनाळा घाटावरील आज(26 फेब्रुवारी) दुपारची ही घटना असून राजुरा आणि बल्लारपूर तालुक्यांच्या सीमेवरून वाहत असलेल्या वर्धा नदीपात्रात ही घटना घडली आहे. महाशिवरात्री निमित्त गावातील काही लोकं नदी घाटावर अंघोळीसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. मात्र बुडालेले तिन्ही तरुण नदीच्या दुसऱ्या काठावर आंघोळीसाठी गेले आणि त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल असलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.  तुषार शालिक आत्राम (वय 17 वर्ष), मंगेश बंडू चणकापुरे (वय 20 वर्ष) आणि अनिकेत शंकर कोडापे (वय 18वर्ष) अशी मृतकांची नावं आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच  राजुरा आणि बल्लारपूर पोलीस यांनी घटनास्थळाची माहिती घेऊन मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


अंघोळ करताना व्हिडिओ शूट करत होता, तितक्यात....


पुण्यातील खेड तालुक्यात भाऊ-वहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीये. चुलत बहीण अंघोळ करत असताना भावाने व्हिडीओ शूटिंग करायला आला. मात्र बहिणीच्या लक्षात ही बाब आल्यानं दिराची विकृती समाजासमोर आली. शेल पिंपळगावात आज सकाळी ही घटना घडलीये. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम चुलत चुलत दिराला ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई सुरु आहे.


हे ही वाचा