Mumbai-Pune highway Accident : अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर निघाला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; दोन महिला ठार, चौघे गंभीर, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
Khopoli Accident News: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला ठार झाल्या आहेत, तर चौघे गंभीर जखमी असल्याची माहीत समोर आली आहे.

Khopoli Accident News: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघाताची (Old Mumbai-Pune Highway Accident) घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला ठार झाल्या आहेत, तर चौघे गंभीर जखमी असल्याची माहीत समोर आली आहे. जुन्या मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशनसह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर निघाला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं
पुढे आलेल्या माहितीनुसार, खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने एचओसी ब्रीजजवळ अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले. या अपघातात कारमधील एक आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली. तर चौघे जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेल्प फाउंडेशन सह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र या अपघातातील चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती नाजुक असल्याचे ही बोललं जात आहे.
ड्रग्ज प्रकरणाची मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली दखल; पोलिसांवर कारवाईची मागणी
मिरा रोड येथील ड्रग्ज प्रकरणाची गंभीर दखल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. एबीपी माझाने या प्रकरणावर प्रकाश टाकल्यानंतर, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः हाटकेश परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या दरम्यान, त्यांनी ड्रग्ज विक्रीत सहभागी असलेल्या व्यक्तींचा पर्दाफाश करणाऱ्या युवकाची भेट घेतली आणि त्याचे कौतुक केले. तसेच काशिगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच मिरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
“माझ्या मतदारसंघात ड्रग्ज विक्री कदापि सहन केली जाणार नाही,” असे ठामपणे सांगत सरनाईक यांनी ड्रग्ज रॅकेटमध्ये स्थानिक पोलीस यंत्रणेचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. “पोलिसांचा सहभाग नसता, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची विक्री कशी काय शक्य झाली असती?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरनाईक यांनी सांगितले की, त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधला असून, दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ते करणार आहेत. तसेच हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या


















