सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी आणि इतर मागण्या संदर्भात शासकीय रुग्णालयातील परिचरिकांचा 18 जुलै पासून बेमुदत संप सुरू आहे. या संपात प्रोबेशनवर (परिविक्षा) असलेल्या  अधिपरिचारिका सहभागी झाल्या आहेत. शासन नियमानुसार अधिपरिचारिका पदाकरिता 2 वर्षांचा परिविक्षा (प्रोबेशन) कालावधी लागू राहतो. त्यामुळे ज्या प्रोबेशनवर असलेल्या परिचारिका या संपात सहभागी असल्याचे निदर्शनास येणार त्यांची सेवा विना चौकशी समाप्त करण्याचा इशारा देण्यात आलाय. 

परिचारिकांकडून राज्यभरात बेमुदत संप सुरू

दरम्यान, नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो परिचारिका काल (18 जुलै) पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचे कालपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.नुकतेच परिचारिकांकडून एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला होता. तर काल पासून मात्र बेमुद्दत संपाला सुरवात झाली आहे. एक दिवसीय लाक्षणिक संप करून ही प्रशासनाने मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे परिचारिकांनी कालपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू केला आहे. सातव्या वेतन आयोगमधील वेतन त्रुटी दूर करावी, अशी परिचारिकांनी प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी विविध सोयी बद्दलच्या मागण्या ही आहेत. त्यामुळे परिचारिकांकडून संप करण्यात आला आहे.

रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती

नागपुरात शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी याशिवाय इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालय या तीन रुग्णालयातील शेकडो परिचारिका संपावर गेल्यामुळे तीनही रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. काल लाक्षणिक संपाच्या दिवशीही होणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या अर्धी झाली होती. त्यामुळे बेमुदत संपाच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या