Nagpur News नागपूर : आक्रमक व विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा नवीन प्रदेशाध्यक्षाची काँग्रेसला गरज असून त्याचा शोध सुरू असल्याचे प्रतिक्रिया काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे. पक्ष मला संधी देईल तर मला नक्कीच प्रदेशाध्यक्ष बनायला आवडेल असे ही नितीन राऊत म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांनी प्रक्षश्रेष्ठीकडे प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मात्र त्यामुळे पक्षात मरगळ आली, असे म्हणता येणार नाही. निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत आहे. सध्या नाना पटोले हे विधिमंडळ गट नेता पदाच्या भूमिकेत गेले आहे. मात्र ते पद त्यांना मिळेल का हे पक्षश्रेष्ठी ठरवेल, असे ही नितीन राऊत यांनी सांगितले.
संधी देईल तर मला नक्कीच प्रदेशाध्यक्ष बनायला आवडेल- नितीन राऊत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याच्या अनेक चर्चा पुढे आल्या असताना नुकतेच नाना पटोले यांनी स्वत: यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं होतं. मी पद सोडलेलं आहे, मी हाय कामंडला ही सांगितले आहे की मला मुक्त करा. अशा शब्दात नाना पटोलेंनी यावर भाष्य केलं होतं. तर दुसरीकडे भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या बदलानंतर आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद बदलाचे वारे वाहत होते. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षपद कोण याकडे साऱ्यांचे लक्ष्य लागलं आहे.
दरम्यान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असल्याचे पुढे आल्यानंतर या पदासाठी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत, तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का असेल, अशी चर्चा काँग्रेस पक्षात रंगली असताना, काँग्रेसला आक्रमक व विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा नवीन प्रदेशाध्यक्षाची गरज असल्याचे मत काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मांडली आहे. इतकंच नव्हे तर या पदासाठी स्वात: ची तयारीही बोलून दाखवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
