Nileschandra Muni on Acharya Nayan Padmasagar: औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्यानंतर औरंगजेबाचा नाश करण्यासाठी ज्या महाराणीचा जन्म झाला, त्या महाराणी ताराराणी 'जैन' होत्या, अशी मुक्ताफळे उधळत अकलेचे तारे तोडल्याने आचार्य नयन पद्मसागर यांच्याविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. त्यांच्याविरोधात आता जैन मूनी निलेशचंद्र यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत चपराक दिली आहे. आचार्य नयन पद्मसागर  महाराष्ट्राची जाहीर मागावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्यामुळेच आणि मंगलप्रभात लोढांमुळे मराठा विरुद्ध मारवाडी वाद होत असल्याचा हल्लाबोल निलेशचंद्र यांनी केला. महाराणी ताराराणी या जैन नव्हत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. महावीर जयंती दिनी मराठा इतिहास सांगण्याची काय गरज होती? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. हा मराठा विरुद्ध मारवाडी वाद पेटवण्याचा उद्योग असल्याची टीका सुद्धा निलेशचंद्र मूनी यांनी केली. 

नयन पद्मसागर यांचा दावा फेटाळून लावताना ते म्हणाले, ताराराणी हा या जैन नव्हत्या. त्यांनी इतिहास सांगताना स्पष्ट केले की, "सरसेनापती हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती आणि त्यांचे मित्र पण होते,त्या मराठा योद्धा होत्या. हंबीरराव मोहिते यांनी त्यांना शास्त्रकला युद्धकला सर्व शिकवले होते. नयपद्मसागरजी यांनी हा इतिहास जपला पाहिजे. त्यांना जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

मराठी-मारवाडी वादाचे राजकारण

मंगलप्रभात लोढा आणि नयन पद्मसागर यांच्यावर आरोप करत ते म्हणाले, "मराठी आणि मारवाडीचा वाद यांनीच काढला. यांना फक्त राजकारण करायच आहे मराठी आणि मारवाडीत वाद करायचा आहे. 52 कबुतर खाने बंद करण्यासाठी मंगल प्रभार लोढा आणि हा नय पद्मसागर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. जे काही झालं ते एकनाथ शिंदेंचा गेम वाजवण्यासाठी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

आचार्य नयन पद्मसागर यांनी अकलेचे तारे तोडले

दरम्यान,  छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी 25 वर्षे औरंगजेबशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं. ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली.  एकीकडे हा सर्व इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी मात्र त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. महाराणी ताराराणी या जैन समूदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मोदी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला

दुसरीकडे, आचार्य नयन पद्मसागर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. ते म्हणाले की, "जो समाज धर्माला विसरतो त्याला भविष्य नसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळालं पण गुलाम बहरत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले आणि हिंदुना मोठी भेट दिली. वयाच्या 75 व्या वर्षी सुद्धा मोदीजी काम करतात. तुम्ही ते नाही करु शकत नाही."

इतर महत्वाच्या बातम्या