Navratri 2023 : नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. 15 ऑक्टोबरपासून देवी दुर्गा (Goddess Durga) घरोघरी विराजमान होणार आहे. असे मानले जाते की नवरात्रीपूर्वी घरात असलेल्या काही वस्तू फेकून द्याव्यात अन्यथा व्रत आणि उपासनेचे फळ मिळत नाही. शास्त्रानुसार नियम जाणून घ्या
नवरात्रीचे 9 दिवस महत्त्वाचे
शास्त्रात शारदीय नवरात्रीचे 9 दिवस खूप शक्तिशाली मानले गेले आहेत. असे म्हटले जाते की, या काळात देवी दुर्गेची पूजा करून ज्याला आशीर्वाद मिळतात, त्याला कधीही कोणत्याही संकटाचा सामना करावा लागत नाही, देवी दुर्गेच्या आगमनापूर्वी काही विशेष कार्य पूर्ण केले पाहिजे, अन्यथा त्याला देवीच्या पूजेचे फळ मिळणार नाही.
शारदीय नवरात्री, घटस्थापनेचा मुहूर्त
शारदीय नवरात्रीच्या सर्व तिथी महत्त्वाच्या मानल्या जातात. या काळात भक्त विधीपूर्वक देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. मात्र यंदा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सर्वप्रथम भक्तांच्या घरी घटस्थापना केली जाते. या वेळी घटस्थापनेची योग्य वेळ 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 11:38 ते 12:23 अशी आहे.
नवरात्रीच्या आधी या गोष्टी घरातून काढून टाका
शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरात ठेवलेले जुने जोडे आणि चप्पल काढून टाका.
असे मानले जाते की, यामुळे नकारात्मक उर्जेचे प्रसारण वाढते. अस्वच्छता पसरते आणि जिथे घाण असते तिथे देवी दुर्गा वास करत नाही.
देवीच्या आगमनापूर्वी, घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि धूळ काढून टाका.
घरात ठेवलेले तामसिक अन्न बाहेर काढावे.
घरात चुकूनही दारू ठेवू नका. घरात या गोष्टी असल्याने देवी दुर्गा दारातून निघून जाते. 9 दिवस उपवास आणि उपासना व्यर्थ जातात.
देवीचे स्वागत करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकू लावून स्वस्तिक बनवावे
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घर रांगोळीने सजवावे. असे म्हणतात की, याने दुर्गा माता खूप आनंदित होते आणि कुटुंबाला आशीर्वाद देते
नवरात्रीमध्ये देवीचे आवाहन करण्यापूर्वी घरभर गंगाजल शिंपडावे आणि 9 दिवस फक्त सात्विक अन्न शिजवावे.
तसेच रात्रीच्या वेळी खरकटी भांडी ठेवू नका. असे केल्याने देवीचा कोप होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Yearly Horoscope 2024 : नववर्ष 2024 मध्ये 'या' राशींचे भाग्य चमकेल, देवी लक्ष्मीची असेल कृपा, जाणून घ्या