Navi Mumbai Electronics and Print Media Reporters Association : नवी मुंबई इलेक्ट्रॉनिक ॲंन्ड प्रिंट मीडिया रिपोर्ट्स असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून त्यामध्ये एबीपी माझाचे प्रतिनिधी विनायक पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सामनाचे बाळासाहेब दारकुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी ही पुढच्या दोन वर्षांसाठी कामकाज पाहणार आहे.  


नवी मुंबई इलेक्ट्रॉनिक ॲंन्ड प्रिंट मीडिया रिपोर्ट्स असोसिएशन या पत्रकारांच्या आघाडीच्या संघटनेची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी ABP माझाचे प्रतिनिधी विनायक पाटील आणि उपाध्यक्षपदी दैनिक सामनाचे प्रतिनिधी बाळासाहेब दारकुंडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी आजतकचे प्रतिनिधी निलेश पाटील, खजिनदार म्हणून दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी शेखर हंम्प्रस यांची निवड झाली. 


कार्यकारिणी सदस्य -


शिल्पा नरवडे (पुढारी चॅनल ) , 
ज्ञानेश्र्वर जाधव  (दैनिक आपल महानगर ) 
दत्तात्रय सुर्यवंशी (साप्ताहिक प्रबोधनदिशा) 


ही कार्यकारिणी पुढील दोन वर्षासाठी काम पाहिल. संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मावळते अध्यक्ष निलेश पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विनायक पाटील यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली. संस्थेमार्फत पत्रकारांच्या भवितव्याबाबत विविध योजना राबविण्याबाबत यावेळी साधक बाधक चर्चा करण्यात आली. 


पत्रकारांच्या जीवन (टर्म पॅालिसी) आणि आरोग्य विमा (मेडिक्लेम पॅालिसी) लवकरच काढण्यात येणार असून ज्यांची स्वतःची घरे नाहीत त्यांच्यासाठी अजून सकारात्मक पावले उचलण्याचं काम आपल्या संघटनेमार्फत करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी सांगितले. आरोग्याबरोबर पत्रकारांच्या पाल्यांसाठी शिक्षण घेताना काय मदत करता येईल यावरही संघटना भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 


संघटनेचे सक्रिय सदस्य - 


नामदेव मोरे ( दैनिक लोकमत ), सुर्यकांत वाघमारे ( दैनिक लोकमत ), योगेश पिंगळे ( दैनिक लोकमत) , असिफ बागवान ( दैनिक लोकसत्ता ), संतोष सावंत ( दैनिक लोकसत्ता ) , सिध्देश प्रधान ( दैनिक नवराष्ट्र ), शरद वागदरे ( दैनिक पुण्यनगरी ), वसंत जाधव ( दैनिक सकाळ ), साईनाथ भोईर ( दैनिक सागर पुण्य नगरी) संजय  गुरव (साप्ताहिक सरकार राज ), नितीन सकपाळ ( साप्ताहिक वृत्तरेषा ) मनोज भिंगार्डे ( APN NEWS ) 


संघटनेने याआधी केलेली कामे आणि सक्रिय सहभाग


१) सिडकोच्या प्रत्येक गृहप्रकल्प सोडतीत पत्रकारांसाठी 5 टक्के कोटा करून घेणे. यामुळे नवी मुंबई बरोबर मुंबई आणि राज्यातील पत्रकारांना नवी मुंबईत हाक्काचे कमी किंमतीत घर घेता आले. 


२) सिडको कडून पत्रकार कॉलनी साठी प्लॅाट उपलब्ध करून घेणे. 


३) कोरोना मध्ये सुरवातीच्या काळात टेस्टींग होत नसताना तात्कालिन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून स्पेशल डॅाक्टर टीम उपलब्ध करून नवी मुंबईतील पत्रकारांच्या कोरोना टेस्ट करून घेण्यात आल्या. 


४) व्हॅक्सिनची कमतरता असताना महानगर पालिका प्रशासनाकडून व्हॅक्सिन कॅम्प लावून व्हॅक्सिन उपलब्ध करण्यात आले. 


५) कोरोना मध्ये कोणी बाहेर पडण्याची हिंमत करत नसताना महिन्याला दोन वेळा जीवनावश्यक वस्तूंचे किट पत्रकारांपर्यंत पोचवणे.


६) पत्रकार हाल्ला विरोधी कायदा करण्यात यावा यासाठी वारंवार आंदोलन करून शासनाचे डोळे उघडणे. 


७) पत्रकारांच्या विरोधात शासन , प्रशासन निर्णय घेत असताना त्या त्या वेळेस वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून पत्रकारांचा आवाज उचलणे. 


८) राज्यात , देशात पत्रकारांवर हाल्ला झाल्यास निदर्शने करून याचा निषेध करणे. 


९) दिवाळी निमित्त पत्रकार , राजकीय नेते , सामाजिक संस्था आदी प्रतिनिधींचा फराळ आयोजित करणे. 


१०) नवी मुंबईतील निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ऐरोली ते बेलापूर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत बाईक रॅली आयोजित करून जनजागृती करणे.


११) नयनरम्य असलेल्या लेह लडाखचे आठवडाभर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फोटो प्रदर्शन आयोजित करणे.


१२) पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यासाठी सहाय्य करणे.


१३) प्रशासनाच्या अरेरावीचा फटका बसल्यावर विविध वेळी आंदोलन.