एक्स्प्लोर

Navi Mumbai : वनविभागाला चुना लावून शासनाची जमीन शासनालाच विकली, भाजप नेत्याला ईडीचा दणका, 70 कोटींची मालमत्ता जप्त

Forest Land Scam : सातबाऱ्यावर तसेच अधिकृत नोंदींमध्येही वनविभागाचे नाव असताना आरोपी जे एम म्हात्रे यांनी या नोंदींमध्ये फेरफार करून स्वतःचे नाव चढवल्याचा आरोप आहे. 

नवी मुंबई : पनवेलमधील भाजपचे नेते आणि प्रसिद्ध ठेकेदार जे एम म्हात्रे यांची ताज्या कारवाईत 18 कोटींची मालमत्ता जप्त करत ईडीने त्यांना दणका दिला आहे. वनविभागाला चुना लावून शासनाचीच जमीन शासनाला विकून कोट्यवधींचा मलिदा खाणाऱ्या जे एम म्हात्रे यांच्याविरोधात वनविभागाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2024 ला गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत 70 कोटींची मालमत्ता जे एम म्हात्रे यांची जप्त केली आहे.

वनजमिनीचा अवैधरीत्या ताबा घेऊन ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करत मोबदला उकळल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने 18 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, यामध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे.

जे एम म्हात्रे हे पनवेल मधील भाजपचे नेते असून त्यांचा मुलगा प्रितम म्हात्रे यांनी उरण विधानसभेतून शेतकरी कामगार पक्षाकडून आमदारकी लढवली होती. सध्या त्यांची सून पनवेल महानगरपालिकेत भाजपची नगरसेविका आहे.

सातबाऱ्यावर तसेच अधिकृत नोंदींमध्येही वनविभागाचे नाव असताना आरोपी जे एम म्हात्रे यांनी या नोंदींमध्ये फेरफार करून स्वतःचे नाव चढवले. शासनाचीच जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून या व्यवहारातून त्यांना 42 कोटी 40 लाख रुपयांचा मोबदला मिळाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

ईडीच्या तपासात, या रकमेचा वापर करून म्हात्रे यांनी इतर मालमत्ता खरेदी केल्याचे तसेच काही कर्जांची परतफेड केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 69 कोटी 47 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हा मोबदला वनविभागाला देण्याबाबत वारंवार तगादा लावूनही आरोपींनी दुर्लक्ष केल्याने वनविभागाने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2024 गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, जे एम म्हात्रे यांनी ईडी पासून वाचण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाच्याच लोकांनी जे एम म्हात्रे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याची चर्चा सुरू आहे. केलेला भ्रष्टाचार कागदावर आल्याने जे एम म्हात्रे यांना हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget