Mumbai Crime News: महाराष्ट्रातील नवी मुंबई टाऊनशिप येथील तलावामध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीची मृतदेह सापडला आहे. विद्यार्थिनीची हत्या तिच्या प्रियकराने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्येनंतर विद्यार्थिनीच्या प्रियकराने आत्महत्या (Crime News) केली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास बेलापूरजवळील शाळेजवळील तलावात काही मच्छिमारांनी मृतदेह पाहिला. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. पोलिसांनी तलावातील मृतदेह बाहेर काढला.
एनआरआय पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भाविका मोरे असे (वय वर्षे 19) मृत नाव असून ती नेरुळ येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. प्राथमिक तपासात या विद्यार्थिनीचे पनवेल, नवी मुंबई येथील रहिवासी 22 वर्षीय स्वस्तिक पाटील याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबई टाऊनशिप येथील तलाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता असे आढळून आले की, दोघेही दुपारी चारच्या सुमारास तलावाकडे गेले होते, मात्र परत आलेच नाहीत. काही कारणावरून त्यांच्यात भांडण झाल्याची शक्यता आहे, त्यानंतर स्वस्तिकने विद्यार्थिनीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून दिला, त्यानंतर त्याने आत्महत्या (Crime News) केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई शेजारील तलावाजवळ 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. भाविका मोरे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याची माहिती एनआरआय पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिली. बुधवारी दुपारी 4.30 च्या सुमारास डीपीएस शाळेमागील फ्लेमिंगो तलावाला जोडणाऱ्या नाल्यात हा मृतदेह आढळून आला.
नातेवाईकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, बुधवारी मध्यरात्री भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा एफआयआर नोंदवण्यात आला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.