तेलाच्या डब्यात पाणी, नाशिकमधील नागरिकांची फसवणूक
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 02 Mar 2018 05:24 PM (IST)
भंगारातून डबे खरेदी केले जात होते. या डब्यांना तेलाचे डबे असल्याचं भासवत त्यात पाणी भरलं जात होतं.
नाशिक : तेलाच्या नावाखाली पाणी विकून ग्राहकांना फसवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. नेमकं काय प्रकरण आहे? भंगारातून डबे खरेदी केले जात होते. या डब्यांना तेलाचे डबे असल्याचं भासवत त्यात पाणी भरलं जात होतं. या डब्यांना फॉर्च्युन, मुरली अशा कंपन्यांचे स्टीकर्स लावून, 900 रुपयांना विक्री केली जात होती. या टोळीने आतापर्यंत नाशिकमधील सात ते आठ नागरिकांची फसवणूक केली. दरम्यान, तीन आरोपींना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.