(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik APMC : सिन्नरला मतदारांचा समान कौल, तर दिंडोरीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा धुव्वा, नाशिकच्या पाच बाजार समित्यांच्या निकाल एका क्लिकवर
Nashik APMC Result: नाशिकसह जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पाच बाजार समित्यांचा निकाल हाती आला आहे.
Nashik APMC Result: नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांपैकी आज पाच बाजार समित्यांचा निवडणूक निकाल घोषित झाला असून सिन्नर बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलला समसमान मते मिळाले आहेत. तर दिंडोरीत शिवसेनेच्या चारोस्कर यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलला धूळ चारली आहे. देवळा बाजार समिती शेतकरी विकास पॅनलने विजय संपादन केला आहे. तर घोटीमध्ये देखील गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल 16 जागा जिंकत विजय मिळवला आहे.
नाशिकसह जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यापैकी आज बारा बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यातील पाच बाजार समित्यांची मतमोजणी प्रक्रिया देखील पार पाडून निकाल लावण्यात आला. यात घोटी, सिन्नर, देवळा, दिंडोरी आणि कळवण या बाजार समित्यांचा समावेश आहे. या पाचही बाजार समिती निवडणूकमध्ये महाविकास आघाडीचे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. मात्र स्थानिक राजकारण पाहता स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेत चुरशीच्या निवडणुका पाहायला मिळाल्या.
यातील सर्वात महत्त्वाची निवडणूक म्हणजे सिन्नर बाजार समितीची निवडणूक होय. येथील आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघांचे नेतृत्वाखाली पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. या दोन्ही पॅनलला शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली. शेवटी दोन्ही गटांना समसमान म्हणजेच कोकाटे गट नऊ तर वाजे गटाला नऊ असे समसमान जागा मिळाल्याने निवडणूक बरोबरीत झाली आहे.
कळवणला नितीन पवारांचा डंका
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेंसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विद्यमान आमदार नितीन पवार, धनंजय पवार विरुद्ध माजी आमदार जे पी गावित रविंद्र देवरे असा सामना रंगला होता. यात शेतकरी विकास पॅनलने सोसायटी, व्यापारी, हमाल तोलारी गटातून सर्व व ग्रामपंचायत गटातून एक जागेवर विजय मिळवला. तर रविंद्र देवरे यांचे परीवर्तन पॅनलच्या ग्रामपंचायत गटातून तीन जागेंवर समाधान मानावे लागले आहे.
विजयी झालेले उमेदवार
शेतकरी विकास पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण गटातून सुधाकर खैरनार , दिलीप कुवर, बाळासाहेब गांगुर्डे, दत्तू गायकवाड, प्रविण देशमुख, पंढरीनाथ बागुल, सोमनाथ पवार, धनंजय पवार, यशवंत गवळी, सुनिता जाधव, रेखा गायकवाड, बाळासाहेव वराडे, ज्ञानदेव पवार, भरत पाटील, शितलकुमार अहिरे, व्यापारी गट योगेश महाजन, योगेश शिंदे, हमाल तोलारी गटातुन शशिकांत पवार हे विजयी झाले आहेत.
दिंडोरीत शिवसेनेकडून राष्ट्रवादीचा पराभव
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय अटीतटीची होवून माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत 18 पैकी 11 जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन दिंडोरी बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण 18 जागांसाठी अतिशय अटितटीची निवडणूक झाली. अटीतटीच्या लढतीत परिवर्तन पॅनलला 11 जागा तर शेतकरी उत्कर्ष पॅनलला 5 जागांवर समाधान मानावे लागले.
असे आहेत विजयी उमेदवार
यात दत्तात्रय रामचंद्र पाटील, प्रशांत प्रकाश कड, गंगाधर खंडेराव निखाडे, नरेंद्र कोंडाजी जाधव, पांडुरंग निवृत्ती गडकरी, कैलास बाबुराव मवाळ, बाळासाहेब विश्वनाथ पाटील, प्रवीण एकनाथ जाधव, श्याम गणपत बोडके, विमल गुलाबराव जाधव, अर्चना अरुण अपसुंदे, दत्तु नामदेव भेरे, योगेश माधवराव बर्डे, दत्ता पांडूरंग शिंगाडे दत्तु चिंतामण राऊत, नंदलाल मोतीलाल चोपडा, अमित कमलेश चोरडीया, सुधाकर प्रभाकर जाधव अशी निवडून आलेल्या उमेदवारांची नावे आहेत.
सिन्नर बाजार समिती निवडणूक पहिल्यांदा समान कौलं....
आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना प्रत्येकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजेच दोन्ही गटाला समसमान मते मिळाली आहेत. यात भाऊसाहेब रामराव खाडे, विनायक हौशीराम घुमरे, शशिकांत गणपत गावडे, जालिंदर जगन्नाथ थोरात, शरद ज्ञानदेव थोरात, रवींद्र सुर्याभान शिंदे, अनिल दशरथ शेळके, सिंधुबाई केशव कोकाटे, सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर, संजय वामनराव खैरनार, नवनाथ प्रकाश घुगे, ग्रामपंचायत गट श्रीकृष्ण मारूती घुमरे, रवींद्र रामनाथ पवार, गणेश भीमा घोलप, प्रकाश पोपट तुपे, व्यापारी गट : सुनील बाळकृष्ण चकोर, रवींद्र विनायक शेळके, हमाल माघारी गटात : नवनाथ शिवाजी हे निवडून आले आहेत.
देवळ्यात शेतकरी विकास पॅनलला कौल
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर आपल्याच नेत्यांविरोधात लोकमान्य शेतकरी पॅनलने तीन जागा लढवत नेत्यांना चांगलाच घाम फोडला. त्याच बरोबर हमाल तोलारी गटात दोन्ही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी करत एकमेकांविरुद्ध लढत दिली. शुक्रवार रोजी या बाजार समितीच्या मतदानात 1043 पैकी 1017 मतदारांनी मतदान केल्याने 97.50 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत 18 पैकी आठ जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले होते.
असे आहेत विजयी उमेदवार
शिवाजी दोधा आहिरे, योगेश शांताराम आहेर, अभिजित पंडितराव निकम, भाऊसाहेब निंबा पगार, अभिमन वसंत पवार, शिवाजीराव भिका पवार, विजय जिभाऊ सोनवणे, व्यापारी गटातील विजयी उमेदवार निंबा वसंत धामणे, संजय दादाजी शिंदे, तर हमाल मापारी गटात भाऊराव बाबुराव नवले.