एक्स्प्लोर

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Nashik Water Supply Cut : शनिवारी नाशिक  शहरात पाणीपुरवठा राहणार बंद असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे.

Nashik Water Supply Cut : शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) नाशिक  शहरात पाणीपुरवठा राहणार बंद (Water Supply Cut) राहणार आहे. गंगापूर (Gangapur Dam) आणि मुकणे धरणावरील (Mukne Dam) पंपिंग स्टेशनमधील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित (Power Supply Cut) राहणार असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या (Nashik NMC) पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील सहाही विभागात उद्या पाणीपुरवठा होणार नसल्याने शहरवासीयांवर एक दिवसांचे पाणीसंकट ओढवणार आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात चौथ्यांदा पाणीपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत.   

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर, मुकणे धरणांवरील विद्युत विषयक कामांमुळे महानगरपालिकेतील सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद राहणार असल्याने शनिवारी संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे. गंगापूर धरणावर महानगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनसाठी 132 केव्ही सातपूर व महिंद्र या दोन फिडरवरुन 33 केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो. शिवाय बारा बंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. तसेच मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशन येथून एक्सप्रेस फिडरद्वारे जॅकवेलसाठी 33 केव्हीचा वीजपुरवठा केला जातो. मात्र, गंगापूर धरण येथे नवी थेट जलवाहिनीच्या अंतर्गत नवे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

नाशिकमध्ये शनिवारी पाणीबाणी 

यासाठी 33 केव्ही दाबाच्या वीजवाहिन्या शिफ्ट करणे, सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे शनिवारी केली जाणार आहेत. तर मुकणे धरण पंपिंग स्टेशनवरील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे हाती घेण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. गंगापूर आणि मुकणे धरणाद्वारे पंपिंग करता येणार नसल्याने सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी नाशिक शहरातील सहाही विभागात पाणीपुरवठा होणार नाही. तर रविवारी सकाळी देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Guillain-Barré Syndrome outbreak in Pune : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जीबीएसने पहिला रुग्ण दगावला, 36 वर्षीय तरुणानं घेतला अखेरचा श्वास

Guillain Barre Syndrome: पुण्यात जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढला, 20 जण व्हेंटिलेटवर, दोघांचा मृत्यू, ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्ध पातळीवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full PC : तुम्हाला उज्ज्वल निकम देता आले नाहीत, जरांगे यांचा सरकारला खोचक सवालDevendra Fadnavis : PA आणि OSD संदर्भात 125 नावं आली, 109 नावं क्लिअर केल, फडणवीसांचं वक्तव्यJayant Patil And Chandrashekhar Bawankule Meet:जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट, भेटीत नेमकं काय ठरलं?Supriya Sule On Dhananjay Deshmukhअन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळेंचा धनंजय देशमुखांना फोन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
Embed widget