मुंबई : रायगडवर बोलताना अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस त्यावर गप्प बसून होते असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सत्ता नसताना जे सोबती आहेत तेच निष्ठावान आहेत. बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी पुण्याई उभी केली. त्यामुळे मला सत्तेची गरज नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकच्या शिवसेना निर्धार मेळ्याव्यात बोलत होते.
अमित शाहांनी आम्हाला सांगू नये
उद्धव ठाकरे म्हणाले की, "चार दिवसांपूर्वी अमित शाह रायगडवर आले आणि त्यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमीत ठेऊ नका. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सूरत लुटली त्यावेळी त्याची बातमी ही लंडन गॅझेटमध्ये छापून आली होती. त्यामुळे अमित शाहांनी आम्हाला शिवरायांबद्दल सांगू नये."
भाजपला शिवाजी महाराजांबद्दल एवढंच वाटत असेल तर त्यांनी शिवजयंतीला देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
अरबी समुद्रात शिवस्मारक कधी होणार?
शिवाजी महाराजांबद्दल भाजपची भूमिका ढोंगी असल्याची टीका करत अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी होणार असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, "नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी समुद्रात भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने आम्हालाही वाटत होतं की स्मारक होईल. शिवाजी महाराजांपेक्ष्या मोठे कोणाच असू शकत नाही. उदयनराजे म्हणाले की, राज्यपाल भवनमध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक बांधा. शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक करा."
भाजपने मुस्लिमांना 'सौगात ए मोदी' वाटलं
उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेने हिंदुत्व सोडलं अशी बोंब मारणाऱ्या भाजपने बिहारमध्ये 'सौगात ए मोदी'च्या माध्यमातून 32 लाख मुस्लिमांना भेटीचं वाटप केलं. त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आणि बिहारमध्ये बाटेंगे तो जितेंगे असं यांचं धोरण. मी मुख्यमंत्री असताना कसलाही भेदभाव केला नाही. मी केलेल्या कामांमुळे मुस्लिम लोक माझ्यासोबत आले आणि हे घाबरले."
भारतीय जनता पक्ष हा फेक नरेटीव्हवाला पक्ष आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. बिहारमध्ये यांनी नितीश कुमार यांच्यासोबत हे गेले. आंध्रमध्ये चंद्राबाबूसोबत हे गेले. त्यामुळे आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्वाला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
हिंदुत्व जपणारा हा महाराष्ट्र धर्म आहे. आम्ही जय श्रीराम बोलणार, पण तुम्हाला जय शिवराय बोलावे लागेल.
आम्हा वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला. कारण त्याचा हिंदुंशी कोणताही संबंध नव्हता. वक्फ बोर्डच्या विधेयकाला तामिळनाडूच्या अण्णा द्रमुकने विरोध केला. पण दोनच दिवसात अमित शाहा तामिळनाडूत गेले आणि त्यांनी त्यांच्याशी युती केली. कारण तिकडे स्टॅलिन त्यांच्या बोकांडी बसला आहे. भाजपवाले चंद्राबाबू, नितीश कुमार, मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत बसले होते. यांचे हिंदुत्व बुरसटलेले आहे. शेतात बैल लघु शंका करायला जातो तसे वाकडे नका जाऊ, सरळ जा. आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कापून आलो नाही.