Nashik News : कुटुंबीयांसह पालकांनी लक्ष न दिल्यामुळे अनेकदा लहान मुलांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यात यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे पालकांनी वेळोवेळी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. काही क्षणासाठी लहान मुलांपासून लक्ष विचलित झालं तर कुटुंबियांना मोठा धक्का सहन करावा लागतो. अशाच दोन घटना जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात घडल्याचे समोर आले आहे.


पहिली घटना मनमाड शहर पोलीस (Manmad Police) ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मनमाड तालुक्यातील रापली रोड नजीक केकान नगर येथे राहणारे बोरसे कुटुंबियांच्या घरात ही घटना घडली आहे. या घटनेत दोन वर्षाच्या मुलाचा दुर्दैव मृत्यू झाला असून ओंकार सुनील बोरसे (Onkar Borse) असे या लहान मुलाचे नाव आहे. दि.25 मार्च रोजी घटना असून या दिवशी रात्री आठ वाजता ओंकारची आईने गॅसवर अंडी उकडत ठेवली होती. यावेळी ओंकारने खेळता खेळता गॅस ओढल्याने उकळते पाणी त्याच्यावर अंगावर पडल्याने तो भाजला गेला. त्याला जखमी अवस्थेत आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.



दुसरी घटना हरसुल पोलीस स्टेशन (Harsul Police) अंतर्गत सारस ते गावात ही घटना घडली आहे. अंगावर गरम पाणी पडल्याने सारस्ते येथील सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजता आंघोळीसाठी पाणी गरम करण्यात येत होते. याच वेळी हा सहा वर्षे मुलगा पाणी गरम करत ठेवलेल्या भांड्याजवळ गेला असता धक्का लागून गरम पाणी त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीररित्या भाजला गेला. कुटुंबीयांच्या ही घटना लक्षात येताच त्याचे आजोबा मंगळू सोनू चौधरी यांनी हरसुल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना या बालकाचा मृत्यू झाला.


मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या!


एकीकडे धडकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी घर ऑफिस सांभाळून मुलांकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा वस्तू गिळल्याने, अंगावर पाणी पडल्याने, हौदात पडल्याने, स्विमिंग पूल मध्ये पडून बालकांच्या मृत्यूच्या घटना सावर आल्या आहेत. यामध्ये पालकवर्ग आसपास असताना देखील अशा अनुचित घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.