नाशिक : माझी कागदपत्रं खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर एसीबी  कार्यालयासमोर फाशी घेईन, असा इशारा  नाशिकचे (Nashik) ठाकरे गटाचे (Thackeray Group) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी दिला आहे. एसीबीने (ACB)  मला हजर राहण्याची नोटीस बजावली  आहे. पण मला कोर्टातून ऑर्डर झाली आहे, ते 106 पाने आहेत ते दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्याने आठ दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी खोटे कसे पोलिसांनी दाखल करू नये, असे बडगुजर म्हणाले.


सुधाकर बडगुजर म्हणाले, एसीबीने अचानक रात्री सात वाजता नोटीस दिली आणि साडेसात वाजता दोन्ही बंगल्यावर छापा टाकला तपासणी केली.  त्या आधी गुन्हा दाखल केला. 420 कलमांतर्गत  गुन्हा दाखल केला.  53 वर्षात कधी फसवणूक केली नाही. 2006 ला कंपनी मधून निवृत्त झालो. कोर्टात पिटीशन झाले 2011 ला कोर्टातून आदेश झाले. एसीबील कोर्टाची ऑर्डर माहिती नव्हती का? निवृत्ती कधी झाली आणि सेवा निवृत्ती कधी झाली?


चुकीच्या केस शिवसैनिकांवर दाखल का करत आहेत?


कंपनीमधील माझी भागीदारी निवृत्त करण्यात आली आहे असे कोर्टाच्या ओर्डर मध्ये म्हटले आहे. 2014 मध्ये तक्रार केली असताना 14 वर्ष एसीबीला का लागले? दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत आहेत,पोलिसांनी संयम ठेवला पाहिजे.  मागच्या कामगार सेनेच्या केसमध्ये ही पोलिसांनी कारवाई केली नंतर केस मागे घेतली. जर केस मागे घ्यायची तर कारवाई का केली? चुकीच्या केस शिवसैनिकांवर दाखल का करत आहेत? असा संतप्त सवाल बडगुजर यांनी  केला आहे.


नेमकं प्रकरण काय?


एसीबीने दिलेल्या तक्रारीनुसार बडगुजर यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, फसवणूक आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2006 सालचे नाशिक महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रविण गेडाम यांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरुद्ध एसीबीकडे केलेल्या एका पत्राच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उघड चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत समोर आल्यानुसार सुधाकर बडगुजर यांनी मे. बडगुजर अँड कंपनीतून डिसेंबर 2006 मध्ये निवृत्ती घेतल्याबाबतची खोटी आणि बनावट कागदपत्रे बनवली. त्यानंतर नाशिक महानगर पालिकेत सन 2007 पासून नगरसेवक आणि इतर पदे भूषवून बडगुजर अँड कंपनीस नाशिक महानगरपालिकेकडून विविध ठेके मिळवून दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. 


हे ही वाचा :