Nashik Lok Sabha 2024 : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत रस्सीखेच कायम आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाशिकच्या जागेसाठी जोर लावला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी घोषित केली आहे.
महायुतीचा उमेदवार ठरला नसताना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नाशिकला प्रचारासदेखील सुरुवात करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या (India Aghadi) बैठका नाशकात पार पडत असून वॉर रूम (War Room) देखील सज्ज करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावर आणि घराघरात जाऊन कार्यकर्ते राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचा प्रचार करताना दिसून येत आहे.
महाविकास आघाडीकडून वॉर रूमची उभारणी
महाविकास आघाडीकडून वॉर रूमची उभारणी करण्यात आली आहे. या माध्यमातून सोशल मिडियाचा (Social Media) मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मिडिया प्रभावी ठरत असून त्याचा वापर ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
...म्हणून उभारली वॉर रूम
याबाबत ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) म्हणाले की, आजकालच्या युगात अत्याधुनिक पद्धतीने प्रचार करणे महत्वाचे आहे. तरुण पिढीला सोशल मिदियावरून उमेदवाराबाबत माहिती देणे गरजेचे असल्याने वॉर रूमची उभारणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत राजाभाऊ वाजे यांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
महायुतीतून वाजे विरुद्ध कोणाला उमेदवारी?
दरम्यान, आता ही वॉर रूम किती प्रभावी ठरणार हे येणाऱ्या काळात समजेल. मात्र महायुतीचा (Mahayuti Seat Sharing) उमेदवारही जाहीर नसताना ठाकरे गटाने सुरुवात केलेल्या प्रचारामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. महायुतीकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र हेमंत गोडसे (Hemant Godse) देखील या जागेसाठी आग्रही आहेत. आता महायुतीकडून राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात भुजबळ का गोडसेंना उमेदवारी मिळणार की कुणा तिसऱ्याचीच लॉटरी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Loksabha : लोकसभेचं तिकीट न मिळालेले विजय करंजकर अजूनही वेटिंगवरच, उद्धव ठाकरेंशी भेट नाहीच!
'जे देशद्रोह्यांसोबत नाचतात, त्यांच्याबद्दल काय बोलणार', हेमंत गोडसेंचा सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल