Janasthan Award 2025 : सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानची घोषणा; असं आहे पुरस्काराचं स्वरूप
Janasthan Award 2025 : जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा मानाचा पुरस्कार आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

Janasthan Award 2025 : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या (Kusumagraj Pratishthan) वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची (Janasthan Award) घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर (Satish Vasant Alekar) यांना जाहीर करण्यात आला आहे. सतीश आळेकर यांची मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळख आहे.
जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा मानाचा पुरस्कार असून 10 मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (दि.27) आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर (Kumar Ketkar), कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके (Vasant Dahake), जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी (Vilas Lonari) यांनी याबाबत घोषणा केली. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे जनस्थान पुरस्काराचे स्वरूप आहे.
सतीश आळेकर यांच्याबद्दल...
सतीश वसंत आळेकर हे मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. पुण्याच्या थिएटर अकादमीचे संस्थापक सदस्य आहेत. महानिर्वाण (1974), महापूर (1975), अतिरेकी (1990), पिडीजात (2003), मिकी अनी मेमसाहिब (1973), आणि बेगम बर्वे (1979) ही नाटक त्यांनी दिग्दर्शित केले आहे. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्यासमवेत ते आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककार मानले जातात. सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले.
सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके
- मिकी आणि मेमसाहेब
- महानिर्वाण
- महापूर
- बेगम बर्वे
- शनिवार रविवार
- दुसरा सामना
- अतिरेकी
- पिधिजात लोकजात
- एक दिवस माथाकडे एक दिवस मठाकडे
- ठकीशी संवाद
सतीश आळेकर यांना मिळालेले पुरस्कार
- अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’
- एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्सवात विशेष सन्मान.
- एशियन कल्चरल कौन्सिल(न्यू यॉर्क) चा सन्मान
- तन्वीर सन्मान
- नांदीकार सन्मान
- पद्मश्री पुरस्कार
- द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार
- फुलब्राईट शिष्यवृत्ती
- फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती
- बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी सन्मान
- सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
