Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा बदनामीकारक मजकूर सामनामध्ये प्रसिद्ध केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. .मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरण आहे. राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.
न्यायालयात हजर न राहिल्याने यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता
न्यायालयात हजर न राहिल्याने यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
संजय राऊतांनी नेमके काय आरोप केले होते?
शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गट बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अनेकांवर आरोप करण्यात आले होते. यापैकी दादा भुसे एक. संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. यात त्यांनी लिहलं होत की, 'हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल.' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावर मंत्री दादा भुसे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या दहा-बारा वर्षात मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखाना डीआरटी कोर्टच्या माध्यमातून जाहीर लिलावाद्वारे त्याची विक्री झाली होती. आणि त्या विक्रीच्या काळामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शेअर्स गोळा केले होते. दुर्दैवाने मोठी रक्कम उभी राहू शकली नाही. त्यावेळी जमा झालेली रक्कम भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीला आरटीजीएस केली होती, असे भुसे म्हणाले होते. यावर बोलताना संजय राऊतांनी दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते. दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे संजय राऊत यांनी अनेकदा सांगितले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते.
महत्वाच्या बातम्या: