Prithviraj Chavan on RSS :  काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोधक आहे हे कुठल्या मूर्खाने सांगितलं? असा सवाल करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. 2023 मध्ये आम्ही घटना दुरुस्ती विधेयक आणले होते. महिला आरक्षणाचे जनक आम्ही आहोत असे चव्हाण म्हणाले. RSS महिलेला संघचालक करणार का? असा सवाल देखील चव्हाण यांनी केला. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

प्रत्येक पेपर फुटतो आणि त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार 

प्रत्येक पेपर फुटतो आणि त्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जबाबदार असतात अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पेपर दोन-दोन कोटीला विकला जातो. कोणालाही शिक्षा होत नाही, हे प्रकरण सिरिअस घ्या कोणालातरी शिक्षा झाली पाहिजे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. भाजपच्या काळात हा गोरखधंदा सुरू झाल्याचे ते म्हणाले. सगळीकडे रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. कुंभमेळ्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट नाही. शक्तिपीठ मार्गात 40-40 टक्के कमिशन घेतले जाते असे चव्हाण म्हणाले. कुंभमेळ्याच्या संदर्भात स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलं नाही. ठराविक लोकांनाच कंत्राटे देण्यात आली आहेत असे चव्हाण म्हणाले. 

कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग, शेतकरी समस्या या विविध विषयावर चर्चा झाली

काँग्रेसचे 10 दिवसापासून शिबिर चालू होते, त्या शिबिराच्या समारोपाला राहुल गांधी आले आहेत असे चव्हाण म्हणाले. त्यांनी राज्यातील नेत्यांची बैठक घेतली, यामध्ये त्यांनी विविध विषय सांगितले आहेत. कुंभमेळा, शक्तिपीठ मार्ग, शेतकरी समस्या या विविध विषयावर सांगितल्याचे चव्हाण म्हणाले.  

Continues below advertisement

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत राज्यातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल गांधींनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. शक्तीपीठ महामार्ग, कुंभमेळ्याच्या कामांसह शेतकरी प्रश्नांवर माहिती घेतली आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे.- कुंभमेळ्याच्या कामांतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केंद्रात आवाज उठवणार असल्याची राज्यातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींनी माहिती दिली आहे. याबाबतची  माहिती सूत्रांनी दिली आहे.  काँग्रेस नेत्यांसोबत बैठक संपल्यानंतर राहुल गांधी आता शिबिरात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होऊन राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबारासाठी राज्याच्या विविध भागात कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.