Chandrashekhar Bawankule नाशिक : उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा इगो होता, ते कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) चर्चेसाठी गेले नाहीत. आजच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे वेळोवेळी मोदींकडे चर्चेसाठी जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी विकासकामे होत असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 


नुकतेच राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकला दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर दाखल होणार आहेत. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.


एकत्र राहिलो तर सगळं शक्य


बावनकुळे पुढे म्हणाले की, स्वच्छ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. यात राज्यातील नऊ शहरांचा समावेश आहे.  हे कशामुळे होत? एकत्र राहिलो तर सगळं शक्य आहे, असे ते म्हणाले. 


आजचा दिवस खूप चांगला


२२ जानेवारी अयोध्येत सर्वात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. ही देशातील सर्वात मोठी दीपावली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहे. तसेच ते रामकुंड येथे जलपूजन देखील करणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


महाराष्ट्रासाठी आणखी काय मागता येईल?


लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कुठलीही चर्चा झाली नाही. मोदींकडे अजून महाराष्ट्रासाठी काय मागता येईल? महाराष्ट्राचा अजून काय विकास करता येईल हीच चर्चा तिन्ही नेत्यांमध्ये विमानात झाल्याचे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 


मोदींचा नाशिक दौरा 


शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशिकला आगमन होणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता त्यांचा नाशिकला रोड शो असणार आहे. त्यानंतर मोदी रामकुंडावर जाणून जलपूजन करणार आहेत. त्यनंतर काळाराम मंदिरात जाणून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या 'रोड शो'साठी पंतप्रधानांची खास गाडी पाहिलीत का?


PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकला आज पर्वणी! मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही...