एक्स्प्लोर

Nashik Unseasonal Rain : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा 'स्ट्राईक'! झाडं अन् विजेचे खांब कोसळले, रस्त्यांवर पाणीच पाणी, दोन बळी

Nashik Unseasonal Rain : नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवारी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.

Nashik Unseasonal Rain : नाशिक शहरासह जिल्ह्याला सोमवारी (दि. 12) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलेच झोडपून काढले. दिवसभरात नाशिक (Nashik) शहरात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दुपारी शहराच्या अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत होते. त्यानंतर सायंकाळी त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwar) रस्त्यांनाही नदीचे रूप प्राप्त झाले होते. दरवर्षी पावसाळ्यात त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावरून पाणी वाहताना बघायला मिळते. मात्र यंदा मे महिन्यातच रस्त्यांना नदी नाल्याचे रूप आले होते. त्यामुळे नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमधील मान्सून पूर्व नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे. त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यावर पाणी वाहत असल्यानं वाहने देखील अडकून पडली होती. 

अवकाळी पावसाचे दोन बळी

तर सातपूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारजवळ रस्त्याच्या कडेला असलेले जुने गुलमोहराचे झाड मुळासकट उन्मळून पडले. यावेळी येथून दुचाकीवरून जाणारे नाशिकरोड येथील दोघा दुचाकीस्वार युवकांवर हे झाड कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. वादळी वाऱ्यामुळे झाड अचानक जमीन फोडून मुळासकट रस्त्यावर कोसळले. रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना काही कळायच्या आत गुलमोहरचे हे झाड गौरव भास्कर रिपोर्टे (20) आणि सम्यक भोसले (20) या दोघांवर पडले. हे दोघेही मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी, देवळाली गाव येथील रहिवासी आहेत. डोक्याला जबर मार लागल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला. तर सम्यकला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यालाही तपासून मृत केले. 

झाडं अन् विजेचे खांब कोसळले

वादळामुळे इंदूर-पुणे महामार्गावर बसस्थानकासमोर झाड कोसळले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी इंदूर-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे महावितरणची मुख्य वायर तुटून पडली व विजेचा खांबही कोसळला. सुदैवाने याचादेखील कोणाला त्रास झाला नाही. स्थानिक नागरिकांनी सतर्कता बाळगून तत्काळ महावितरण कार्यलयात फोन केला. यामुळे त्यांनी विद्युत्तपुरवठा बंद केला. त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी या भागातील वीजपुरवठा बंद झाला. 

घराचे पत्रे उडाले, शेतीचेही मोठे नुकसान

बागलाण तालुक्यातील मुंजवाड गावासह परिसरात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने घराचे पत्रे उडून शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला, तर आंब्यांसह फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने बागायती पिके टोमॅटो, काकडी कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी व भाजीपाल्यासह कांदा पिकाचे नुकसान झाले.

आणखी वाचा 

Maharashtra Weather Update: मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पुढील तीन दिवस पावसाचा अलर्ट; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Nashik TCS Case News: बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांचाही आरोपींमध्ये समावेश
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget