नाशिक : सध्या उन्हाळा असल्याने पाण्यात पोहण्याचा (Swimming) मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यामुळे, स्विमिंग पुल, विहिर किंवा पर्यटनस्थळी पाण्यात उतरुन जलक्रीडा केली जाते. मात्र, स्विमिंग पुलातील पोहणे एका युवकाच्या जीवावर बेतलं आहे. मनमाडमधील (Nashik) एका हॉटेलमधील स्विमिंग पुलात पोहण्यासाठी उतरलेल्या 30 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गणेश गायकवाड असे मृत्युमुखी पडले तरुणाचे नाव असून तो नाशिक येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी (Marraige) मनमाडला आला होता. 

Continues below advertisement

गणेश हा सायंकाळी शहरालगत असलेल्या एका हॉटेलच्या स्वीमिंगपूलमध्ये मित्रासोबत पोहण्यासाठी गेला असता पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागला. या दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषिक केले. हॉटेलच्या स्विमिंग पुलातील पाण्यात गणेश बुडत असल्याचे पाहून त्याच्या मित्रांसह उपस्थितांना त्याला बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर, तातडीने कारमधून हॉस्पिटलकडे नेण्यात येत होते, यावेळी शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे मोठी गैरसोय झाली. त्यामुळे, काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सूरू केला आहे.

अमरावतीतही चौघांचा बुडून मृत्यू

अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या दोन बहिण भावांसह चौघांवर काळानं झडप घातली आहे. तलावामध्ये बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावतीच्या धातखेडा तलावात घडली आहे. सोनाली नरेंद्र जोशी वय अंदाजे 16, आदित्य नरेंद्र जोशी वय अंदाजे 12, पायल बबलू पंडीत वय अंदाजे 21, यश गजानन काकणे वय अंदाजे 13 अशी बुडून मृत्यू पावलेल्याची नावे आहेत. 

Continues below advertisement

हेही वाचा

रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी, SP तेजस्वी सातपुतेंनी काय काय विचारल? बाहेर येताच म्हणाल्या, मी पुण्याला निघाले...