Nashik Tree Cutting: नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या (Tapovan Tree Cutting) मुद्द्यावरूनजोरदारविरोधहोतअसतानाआता राष्ट्रीय हरित लवादाकडून जिल्हा प्रशासनाला जोरदार दणका देण्यातआलाआहे. कायदेशीर प्रक्रिया केल्या शिवाय नाशिक जिल्ह्यात वृक्ष तोड न करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाकडून देण्यातआलेआहे. समृद्धी महामार्ग लागत करण्यात आलेल्या वृक्ष तोडी संदर्भात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका दाखल केली होती. यावर राष्ट्रीय हरित लवादाकडून (National Green Tribunal - NGT) स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती अंतरिम आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडी थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे.
Nashik Tree Cutting: परवाना मिळाल्या शिवाय एकही झाड न तोडण्याचे आदेश
नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य 1800 वृक्षतोडीबद्दल शहरात तीव्र विरोध सुरू असताना, राज्य सरकारने शहरात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मोहिमेअंतर्गत नुकतेच राजमुद्री येथून आणलेली झाडे आता टप्याटप्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली असून पहिला ट्रक नाशिकमध्ये दाखल झालाय. तरदुसरीकडे 200 वर्ष जुने वटवृक्ष तोडल्याचा पर्यावरण प्रेमींनी आरोपकरतयाविकासकामातहोणाऱ्याझाडांच्या कत्तलींवरआक्षेपघेतलाहोता. अशातचआता तपोवनातील वृक्ष तोडीला हरित लवादाने संरक्षण दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील वृक्ष तोडीला अंतरीम आदेश देताना कायदेशीर प्रक्रिया राबवून वृक्ष तोडीचा परवाना मिळाल्या शिवाय एकही झाड न तोडण्याचे आदेश दिलेआहे.
Nashik Tree Cutting: 1800 झाडांची तोड, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींनी तीव्र विरोध
नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन परिसरात साधू-महंतांच्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याची योजना आहे. या कामासाठी सुमारे 1800 झाडांची तोड प्रस्तावित होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींनी तीव्र विरोध नोंदवला आहे. तपोवनातील झाडे तोडण्याआधी न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी, असं आमचं मत आहे. ती न राबवताच वृक्षतोड केली जात आहे. एकदा तोडलेल्या वृक्षांचं पुनर्रोपण नीट केलं जातं नाही, हा अनुभव आहे. यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या एक्झिबिशन सेंटरचा काहीही उपयोग झाला नाही. वृक्षतोडीला आमचा विरोध आहे, असे मत वकील श्रीराम पिंगळे यांनी बोलतानाव्यक्तकेलंय.
आणखी वाचा