नाशिक : गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटनांचं केंद्रबिंदु बनलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातून आता आरोग्यविषयक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालेगावात दोन चिमुकल्यांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली असून मालेगाव (Malegaon) शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटसर्प आजार कालबाह्य झाल्याचा दावा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, दोघ लहान मुलांच्या मृत्युने मोठे प्रश्नचिन्ह उभारले असून वेगवेगळ्या लसीकरणानंतरही मृत्यूची घटना घडल्याने आरोग्य (Hospital) व्यवस्थेच्या कारभारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

मालेगावात शहरातील दोन लहान बाळांचा घटसर्प या गंभीर आजाराने मृत्यू झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. एकीकडे सरकार घटसर्प हा आजार जवळपास संपल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. तसेच, दुसरीकडे लसीकरणावरही मोठा खर्च होत असतांना दोन निष्पाप बालकांचा मृत्यू होतो, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून आरोग्य यंत्रणांवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालेगावात वास्तव्यास असलेल्या राजस्थानी कुटुंबातील ही दोन बालके असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे मालेगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, मालेगावात आरोग्याचे प्रश्न नेहमीच गंभीर स्वरूपाचे पाहायला मिळतात. कधी काळी कोरोनाचे हॉटस्पॉट मालेगाव बनलेले होते तर टायफाईड, डेंग्यू, मलेरिया, डायरिया आदी आजार तर नित्याचेच झालेले आहेत. त्यामुळे, महापालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी घटसर्प रोगाने बाधित दोन चिमुकल्यांचा मृत्यू गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

Continues below advertisement

काय आहे घटसर्प रोग?

पावसाळ्याच्या तोंडावर घटसर्प ह्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जनावरांमध्ये आढळून येतो. त्यालाच हेमोरॅजिक सेप्टिसिमिया नावाचा एक धोकादायक आजार असेही म्हणतात. त्यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरे दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच लसीकणर करुन घेणे हाच यामधील सर्वोत्तम पर्याय आहे. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या गावोगावी लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसलाही विलंब न करता लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. विशेषत: गाई आणि म्हशीमध्येच याची लक्षणे आढळतात. शिवाय हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलावही लवकर होतो. हा आजार मे-जूनमध्ये होतो.हा एक जिवाणूजन्य रोग आहे. त्यामुळे त्याच्याविषयी माहिती असून उपचार पध्दती जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. दरम्यान, त्यामुळेच प्राण्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 

हेही वाचा

पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार