Nashik : राज ठाकरेंची मनसे आणि शिवसेना उबाठा गटाच्या वतीने नाशिक शहरातील बिडी भालेकर मैदानातून मोर्चा सुरू झाला आहे . हजारो मनसैनिक आणि शिवसैनिक या मोर्चात सहभागी होणार आहेत या मोर्चात सहभागी होणाऱ्या मोर्चेकरांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मसाले भात आणि शिरा असा मेनू या मोर्चाकरांसाठी ठेवण्यात आला आहे. यांचा नाशिक मध्ये संयुक्त मोर्चा निघणार आहे .या मोर्चासाठी दोन्ही पक्षांमधील बडे नेते थेट मुंबईहून नाशिकला दाखल होत आहेत . 25,000 पेक्षा जास्त मनसैनिक आणि शिवसैनिक नाशिकच्या बिडी भालेकर मैदानात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे .मोर्चात सहभागी होणाऱ्या मोर्चेकरांसाठी मसाले भात आणि शिरा ठेवण्यात आलाय .
मोर्चेकऱ्यांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था
सामान्यांच्या प्रश्नासाठी आज नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेच्यावतीने संयुक्त जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चेकरांसाठी मसाले भात आणि शिरा असा खास मेनू ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने मोर्च्यादरम्यान योग्य सुरक्षेची व्यवस्था केली असून रस्त्यांवर पोलिस तैनात आहेत.
नाशिकच्या मोर्चा बड्या नेत्यांची हजेरी
मोर्चात प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे या मोर्चामध्ये थेट सहभाग घेणार आहेत. याशिवाय, नाशिक जिल्ह्यातील विविध तालुका व परिसरातून हजारो कार्यकर्त्यांनी मोर्च्यासाठी बिडी भालेकर मैदानाकडे येण्यास सुरुवात केली आहे.
संजय राऊतही आंदोलनात सहभागी होणार
संजय राऊत पुढे म्हणाले की, आमच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार कळवून झाले आहे. आंदोलने देखील केलेली आहेत. रास्ता रोको केलेले आहेत. पण शेवटी असे ठरले की, नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा. जन आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचे लक्ष वेधून घ्यावे. मनसेचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यात बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि आमचे स्थानिक नेते देखील तिथे उपस्थित आहे. मला देखील या मोर्चाला येण्याचा आग्रह करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मी तिथे जात आहे, असे देखील त्यांनी सांगितले. संजय राऊत म्हणाले की,आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे, जी परिस्थिती झालेली आहे, त्याच्या विरोधात याआधी देखील आंदोलने झाली आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये आम्ही मोर्चा काढत आहोत.