एक्स्प्लोर

नाशकात कोसळधार! गोदाकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, वाचा सर्व अपडेट्स

नदीकाठी कोणी येऊ नये, आवश्यक काम असेल तरच या परिसरात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निफाडपासून पुढच्या बाजूला नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Nashik Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर सध्या वाढलाय. नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नार, पारसह अनेक नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलाय. जनजीवन विस्कळीत झालंय. विशेषतः नाशिक शहर आणि दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु असून गोदावरी नदीसह नद्या आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गोदाकाठ खळाळला असून  दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचले आहे.

गोदाकाठची मंदिरे आजही पाण्याखाली

शहरात काल दिवसभरात 31 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. परिणामी, गोदावरी नदीच्या काठावर असलेली मंदिरे आजही पाण्याखाली असून नदीचे पाणी अजूनही धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गंगापूरसह नाशिकच्या परिसरातील जवळपास 12 धरणांतून सध्या पाण्याचा विसर्ग सुरु असून त्यामुळे गोदा नदीचा प्रवाह अधिकच वेगवान झाला आहे. नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 'दुतोंडया मारुती' या प्रसिद्ध मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले असून पावसाचा जोर असाच राहिला, तर लवकरच पाणी छातीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे नदीकाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही तासांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती ओढवली असून आजूबाजूच्या परिसरात पुन्हा पुराचे पाणी शिरले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीची पूरपरिस्थिती कायम आहे. काल दिवसभरात ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गोदावरी नदीकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. गंगापूरसह जवळपास 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्यावर पाणी आलेलं आहे. गोदावरी नदी आजही दुथडी भरून वाहत असल्यामुळे गोदा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. काही मिनिटांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. 19 जून रोजी नाशिक शहरात पहिल्यांदा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यानंतर गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढली होती. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आजही सकाळी 6 वाजल्यापासून 5186 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून केला जात आहे. होळकर पुलावरून 10000 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग रामकुंडाच्या दिशेने येत आहे. आनंदपल्लीपासून ठिकठिकाणी नदी-नाले आणि शहरात पडणाऱ्या पावसाचे पाणी गोदापात्रामध्ये मिसळत असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. गंगा गोदावरी मंदिरही पाण्याखाली गेले आहे, जे 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या काळात उघडले जाते. रामकुंड परिसरातील रस्त्यावरही पाणी आले आहे. नदीकाठी कोणी येऊ नये, आवश्यक काम असेल तरच या परिसरात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निफाडपासून पुढच्या बाजूला नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील विसर्गही वाढला

दिंडोरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. विशेषतः पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु असून नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तालुक्यातील सहाही प्रमुख धरणांमध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. पुणेगाव धरण सध्या 75 टक्के भरले असून या धरणातून उनंदा नदीत 100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे वणी व चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या विसर्गामुळे नद्या खवळलेल्या असल्याने नागरिकांनी पुराचा धोका ओळखून सुरक्षित अंतर राखावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रविवारी (6 जुलै) रोजी नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 4 हजार 656 इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरूय.

हेही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
मालेगावमध्ये 75 वर्षांच्या नरामधाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; सहा महिन्यापासून सगळं सुरू, पैसे अन् चॉकलेटचे आमिष, संतापजनक घटना
Mahendra Dalvi cash video: नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ व्हायरल होताच महेंद्र दळवींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लाल शर्टमधील 'तो' व्यक्ती...
Gadchiroli Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत शरीर सुखाची मागणी, कंत्राटी आरोग्य परिचारिकेचं टोकाचं पाऊल; गडचिरोलीच्या मुलचेरातील धक्कादायक प्रकार
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Sayali Sanjeev Entry In Politics: तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
तिशी ओलांडलेल्या सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री? म्हणाली, 'राज साहेबांनी मनसेची...'
Sion Land VHP: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सायनमधील सोन्याचा भाव असणारा भूखंड विश्व हिंदू परिषदेला दिला
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Embed widget