Nashik Police Bharti : नाशिकमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे मैदानी चाचणी परीक्षा सुरू असून या ठिकाणी लांबून आलेली उमेदवारांना निवासाची, छायांकित प्रति व फोटो काढण्यासाठी सोय देखील करून देण्यात आली आहे . त्याचबरोबर शारीरिक चाचणी ही ऑन कॅमेरा करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. 


पोलीस भरती-2021 प्रक्रियेतील मैदानी चाचणी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, आडगांव, नाशिक येथे 2 डिसेंबर रोजीपासून सुरू करण्यात आलेली आहे. 2 ते 3 डिसेंबर रोजी पोलीस शिपाई चालक पदासाठीची मैदानी चाचणी घेण्यात आली असून एकुण 2 हजार 114 उमेदवारांपैकी 1240 उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांची टक्केवारी 58.65 एवढी होती. यातील 1022 उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.


तर डिसेंबर 4 पासून पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेलो असून 7 डिसेंबर पर्यंत म्हणजे गेल्या चार दिवसात दररोज 1300 प्रमाणे 5 हजार 200 उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 429 उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांची टक्केवारी 65.78 एवढी होती. मात 2907 उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. दरम्यान बरेच उमेदवार लांबच्या अंतरावरील असल्याने अगोदरच्या दिवशीच मैदानावर मुक्कामी येत असल्याने अशा उमेदवारांच्या निवासासाठी पोलीस मुख्यालय, नाशिक ग्रामीण येथे व्यवस्था करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीसाठी येतांना उमेदवाराने मुळ कागदपत्र त्याच्या छायांकित प्रती व 4 फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तथापि, उमेदवारांच्या सोईसाठी कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढण्यासाठीची व पासपोर्ट साईन रंगीत फोटो काढण्याची सुविधा मुख्यालयाच्या मैदानावरच उपलब्ध करून देण्यात आली आहे.


पोलीस भरती-2021 प्रक्रियेतील मैदानी चाचणी 20 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व घटकात लेखी परिक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येणार असल्याने लेखी परिक्षेकरिता पात्र होणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेचा दिनांक नंतर कळविण्यात येणार असल्याची माहिती नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


अडचण आल्यास इथे करा संपर्क 
पोलीस भरती प्रक्रिया निःपक्षपातीपणे व पारदर्शकपणे राबविण्यात येत असून प्रत्येक मैदानी चाचणीच्या ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच विडीओ शुटिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उमेदवार मैदानी चाचणीत मिळालेले गुण त्याच दिवशी संध्याकाळी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस् (www.nashikruralpolice.gov.in) प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या सामाजिक व समांतर आरक्षणा स्थानानी मिळाल्याच्या तक्रारी असल्यास नियंत्रण कर, नाशिक येथे (0253 22004011/2004250 या क्रमांकावर तक्रार करण्यात यावी असे आवाहन देखील नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर मैदानी  चाचणी पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नाशिक पोलीसांच्या अधिकृत संकेतस्थळावर जावून आपली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले आहे. 


नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची 164 व पोलीस शिपाई चालकांची 15 रिक्त पदे भरणेसाठी 6 सप्टेंबर 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलीस भरतीकरीता ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार पोलीस शिपाई पदासाठी 18 हजार 935 तर चालक पोलीस शिपाई पदासाठी 2 हजार 994 अर्ज प्राप्त झाले आहेत. असे एकूण 29 हजार 49 आवेदन अर्ज नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.