एक्स्प्लोर

Nashik News : पोहता येत नव्हतं तरी पाण्यात उडी घेतली, काही क्षणातच आक्रीत घडलं; तरुण उद्योजकाचा दुर्दैवी अंत

Nashik News: नाशिकमधील एका तरुण उद्योजकाचा नर्मदा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik News: नाशिकमधील (Nashik) एका तरुण उद्योजकाचा नर्मदा नदीत (Narmada River) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा थरारक क्षण मोबाईल कॅमेरात कैद झाला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव विजेंद्र घाटगे (वय 38) असे असून ते नवीन नाशिक परिसरातील कामटवाडे येथे वास्तव्यास होते.

Nashik News: नर्मदा परिक्रमे नंतर आश्रमात वास्तव्य

विजेंद्र घाटगे हे आध्यात्मिकतेशी जोडलेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. त्यानंतर ते गुजरातमधील शिनोर (जि. बडोदा) येथील बद्रिक आश्रमात वास्तव्यास होते. शुक्रवारी ते नर्मदा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत काहीजण उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी नदीपात्रात उडी घेतली; मात्र काही क्षणांतच ते पाण्यात बुडू लागले.

Nashik News: पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू

पाण्याची खोली जास्त असल्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने विजेंद्र यांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पोहता येत नसल्याचे सांगितले नव्हते. त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनाही पोहता येत नसल्यामुळे काही फुटांवरच विजेंद्र बुडत असताना ते मदत करू शकले नाहीत. घटनेचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

Nashik News: दोन दिवसांनी मृतदेह सापडला

नदीपात्र खोल असल्यामुळे विजेंद्र यांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर रविवारी त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला. तरुण उद्योजकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कामटवाडे परिसरासह संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विजेंद्र घाटगे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 8 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका तरुण उद्योजकाच्या अकाली जाण्याने नाशिक शहरासह व्यावसायिक वर्तुळातही शोककळा पसरली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Vasai Crime News: आई फोन उचलेना म्हणून मुलाने घरी येऊन पाहिलं; हॉलमध्ये रक्ताचे डाग अन् बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर...,वसईत महिलेला घरात घुसून संपवलं

Mumbai Crime News: ब्रेकअप अन् तिचे दुसऱ्या मुलांसोबत फोटो; प्रेयसीकडून मानसिक त्रासासोबतच कथित जातीय अपमानास्पद वक्तव्ये, नैराश्यात गेलेल्या तरूणाने गळ्याला लावला दोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Chhagan Bhujbal: अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका; म्हणाले, 'मलाही आश्चर्य वाटलं की...'
अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका; म्हणाले, 'मलाही आश्चर्य वाटलं की...'
Nashik News: नाशिकमध्ये तीन महिने खासगी बसला 'नो एन्ट्री', सर्व थांबे रद्द; नेमकं काय आहे कारण?
नाशिकमध्ये तीन महिने खासगी बसला 'नो एन्ट्री', सर्व थांबे रद्द; नेमकं काय आहे कारण?
कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
Embed widget