एक्स्प्लोर

Nashik News: पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना

Nashik News: नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी गावात एका महिलेने आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

Nashik News: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यातील शिंदेवाडी गावात एका महिलेने आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. छाया दीपक खाडे (वय 38) यांनी प्रसंगावधान राखत विजेचा धक्का (Electric Shock) बसलेल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढले; मात्र स्वतः विजेच्या प्रवाहात अडकून प्राण गमावले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दीपक खाडे (वय 42) हे शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीवर पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. वीजपंप सुरू करण्यासाठी त्यांनी विजेच्या पेटीवरील बटण दाबताच अचानक त्यांना तीव्र विजेचा धक्का बसला. ही बाब लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता छाया खाडे धावत त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी पतीला जोरात ढकलून विजेच्या संपर्कातून दूर केले. त्यामुळे दीपक खाडे मोठ्या संकटातून बचावले; मात्र छाया स्वतः विजेच्या प्रवाहाच्या विळख्यात अडकल्या.

Nashik News: रुग्णालयात मृत घोषित

गंभीर अवस्थेत छाया खाडे यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांच्या मते, छाया खाडे अत्यंत कुटुंबवत्सल व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

Nashik News: मुलगी बारावीत; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

छाया खाडे यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी बारावीच्या वर्गात शिकत असून, सध्या तिची परीक्षा सुरू आहे. अशा संवेदनशील काळात आईच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Nashik Crime News: निफाडमध्ये मजुराने संपवले जीवन 

दरम्यान, निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे पेठ येथून शेतीकामासाठी आलेल्या 38 वर्षीय मजुराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. विलास देवराम दरोडे (रा. खडकी शिंगाळी, ता. पेठ) असे मृत मजुराचे नाव आहे. विलास दरोडे पेठ तालुक्यातून खेडलेझुंगे परिसरात मजुरीसाठी आला होता. शुक्रवारी (दि. 13) पहाटे त्याने वास्तव्यास असलेल्या घरात विषारी औषध सेवन केले. सकाळी तीव्र उलट्या होत असल्याचे पत्नी लक्ष्मीच्या लक्षात आले. तिने तातडीने विलासला उपचारासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत लासलगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे तपास करीत आहेत.

आणखी वाचा 

Nashik News: 'आता तो घरी सांगेल', भीतीपोटी नाशिकमधील तीन अल्पवयीन पोरी पळाल्या; पोलीस अन् नातेवाईकांनी शोधाशोध केली अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Chhagan Bhujbal: अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका; म्हणाले, 'मलाही आश्चर्य वाटलं की...'
अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका; म्हणाले, 'मलाही आश्चर्य वाटलं की...'
Nashik News: नाशिकमध्ये तीन महिने खासगी बसला 'नो एन्ट्री', सर्व थांबे रद्द; नेमकं काय आहे कारण?
नाशिकमध्ये तीन महिने खासगी बसला 'नो एन्ट्री', सर्व थांबे रद्द; नेमकं काय आहे कारण?
कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
BJP Rajya Sabha Candidate List : भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांचं काय? पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर जाणार
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, टीम इंडियानं पाळला क्षण; सरावाची वेळ बदलली, चर्चा तर होणारच
Iran Israel War : इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
इराण वि. इस्त्रायल-अमेरिका! पाकिस्तान इराणसोबत, तर इटलीच्या मेलोनींचीही स्पष्ट भूमिका; कोण कुणाच्या बाजूने? 
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
मराठवाड्याच्या दाजींची नाद खुळा धुळवड, फुटले रंगांचे सिलेंडर; सदाबहार गाण्यांवर धरला ठेका, पाहा फोटो
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Embed widget