एक्स्प्लोर

Nashik News: 'आता तो घरी सांगेल', भीतीपोटी नाशिकमधील तीन अल्पवयीन पोरी पळाल्या; पोलीस अन् नातेवाईकांनी शोधाशोध केली अन्...

Nashik News: पूर्वपरीक्षेच्या पेपरची झेरॉक्स काढण्यासाठी तीन अल्पवयीन मुली झेरॉक्स दुकानात गेल्या. यावेळी एका मुलाशी बोलताना नातलगाने पहिल्याने मुली घाबरल्या.

Nashik News: नाशिकच्या सिन्नर फाटा (Sinnar Phata) येथील चेहडी पंपिंग परिसरात मंगळवारी रात्री अपहरणाच्या अफवेने एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ही अफवा अखेर फोल ठरली असून, क्षणिक भीतीपोटी घराकडे न जाता लपून बसलेल्या तिन्ही शाळकरी मुली मध्यरात्री सुरक्षित सापडल्या.

चेहडी पंपिंग परिसरात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीची विद्यार्थिनी, तिची मैत्रीण आणि बहीण या तिघी अभ्यासासाठी एकत्र आल्या होत्या. पूर्वपरीक्षेच्या पेपरची झेरॉक्स काढण्यासाठी त्या जवळच्या झेरॉक्स दुकानात गेल्या. यावेळी एका मुलीच्या वर्गातील मुलगा तेथे आला आणि तिच्याशी बोलू लागला. ही बाब अचानक त्या मुलीच्या एका नातलगाच्या नजरेस पडली.

Nashik News: 'आता तो घरी सांगेल'

“ही गोष्ट तो घरी सांगेल” या भीतीने तिघी मैत्रिणी घाबरून गेल्या. घरी गेल्यास रागावले जाईल, बोलणी खावी लागतील, या कल्पनेने त्यांनी तात्काळ घरी न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी परिसरातच एका ठिकाणी लपून बसण्याचा त्यांनी धाडसी पण चुकीचा निर्णय घेतला.

Nashik News: नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

दरम्यान, बराच वेळ उलटूनही मुली घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक, मैत्रिणी आणि ओळखीच्या ठिकाणी चौकशी करूनही मुलींचा थांगपत्ता न लागल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. एकाचवेळी तीन शाळकरी मुली बेपत्ता झाल्याने अपहरणाचा संशय अधिक गडद झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

Nashik News: तिन्ही मुली लपलेल्या अवस्थेत आढळल्या

तक्रार प्राप्त होताच हवालदार सानप यांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. परिसरातील सर्व शक्य ठिकाणी तपास सुरू करण्यात आला. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास परिसरातीलच एका चौकात तिन्ही मुली लपलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Nashik News: नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला

यानंतर पोलिसांनी मुली व त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले. गैरसमज, भीती आणि संवादाच्या अभावातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. आवश्यक समज देऊन तिन्ही मुलींना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. क्षणिक भीतीतून सुरू झालेली ही ‘पलायनकथा’ पोलिसांच्या संवेदनशील व तत्पर हस्तक्षेपामुळे सुखरूपपणे संपुष्टात आली, त्यामुळे परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

आणखी वाचा 

Nashik Crime News: 'आम्ही गुंड आहोत, मारून टाकू'; सराईत गुन्हेगाराच्या 'जेलमुक्ती'साठी प्रेयसीचं भयानक कांड, महिला डॉक्टरकडून उकळली लाखोंची खंडणी, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Rangpanchami 2026: नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Nashik Crime News: नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Embed widget