Nashik News : शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नाशिकच्या गंगापूर गावात नवीन भाजी मार्केट लोकार्पण सोहळा आणि महापौर, उपमहापौर यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला राजाभाऊ वाजे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे देखील उपस्थित होते. ऑपरेशन टायगर आणि आजच्या कार्यक्रमाचा काही संबंध नसल्याचा खुलासा खासदार राजाभाऊ वाजे यांनी केला आहे. 

Continues below advertisement

 मी जिथे आहे, सुखी आहे, आनंदात आहे आणि ठाम आहे, खासदार वाजेंचं स्पष्टीकरण

DPDC मधून मला निधी दिला होता त्या निधीतून कामे झाली त्यासाठी आलो असल्याची माहिती राजाभाऊ वाजे यांनी दिली. उपमहापौर विलास शिंदे यांनी मला बोलाबले होते म्हणून मी आलो. यात कोणतेही राजकारण नाही कोणताही अर्थ अनर्थ काढण्याची आवश्यकता नाही असे राजाभाऊ वाजे म्हणाले. ऑपरेशन टायगर आणि या कार्यक्रमाचा काही संबंध नाही. मी जिथे आहे, सुखी आहे, आनंदात आहे आणि ठाम आहे असं वाजे म्हणाले. श्रीकांत शिंदे आणि माझी दिल्लीत भेट होत असते. आता काही चर्चा नाही, ते मला म्हणाले तुम्ही उद्घाटन करा म्हणून मी उद्घाटन केल्याचे वाजे यावेळी म्हणाले. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाला ठाकऱे गटाचा खासदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात मात्र विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. 

आपण सगळे एकाच विचारांचे, बाळासाहेबांचा विचार घेऊन वाटचाल करतोय

आपण सगळे एकाच विचारांचे आहोत असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण वाटचाल करत आहोत. विलास शिंदे यांच्या प्रयत्नाने भाजी मार्केट लोकार्पण झाले. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत आहोत. अनेक योजना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना राबवल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून लोकांपर्यंत प्रशासनाचे अधिकाऱ्यांना पोहचून त्यांचे काम करायला लावले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कुंभमेळाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत. याआधी कधी झाले नाही इतके काम सध्या नाशिक मध्ये सुरु आहेत असंही श्रीकांत शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Operation Tiger : ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट