ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Nashik News: नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसापूर येथील आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Nashik News: नाशिकच्या कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) विसापूर येथील आश्रमशाळेत (Ashram School) शिक्षण घेणाऱ्या एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे विसरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टीला ताप (Fever) आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार (Treatment) सुरू होते. प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर सृष्टीला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिला अचानक उलटी आणि ताप आला. तिची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik News: दोन दिवसांपासून सुरु होते उपचार
यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे विसापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्येही शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थिनीला ताप आल्याने गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. उपचारानंतरही तिची प्रकृती बिघडत गेल्याने सृष्टीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सृष्टीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Nashik Crime News: आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेतील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी काल संध्याकाळी शाळेतून घरी परतल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली आहे. विद्यार्थिनीने नेमके कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे बोरीपाडा परिसरात शोककळा पसरली असून, विद्यार्थिनीच्या टोकाच्या पावलामागील कारण स्पष्ट होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं





















