एक्स्प्लोर

Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?

Nashik News: नाशिकच्या सटाणा तालूक्यात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर गावात 'भूत ' असल्याची अफवा पसरल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरले आहे.

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आराई गावात मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘गावात भूत फिरत आहे’ अशा अफवा जोर धरू लागल्या असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आराई गावात भुताचा वावर असल्याचे संदेश, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर पसरविण्यात आलेल्या संदेशांमध्ये कधी गावाच्या हद्दीत, कधी मोकळ्या जागेत तर कधी निर्मनुष्य भागात भूत दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या पोस्ट्स आणि व्हिडीओंमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिक रात्री घराबाहेर पडण्यासही घाबरू लागले होते. या अफवांनंतर गावातील काही तरुणांनी तसेच पोलीस प्रशासनानेही परिस्थितीची गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी गस्त घालण्यास सुरुवात केली. संभाव्य ठिकाणी तपासणी करण्यात आली, मात्र कुठेही संशयास्पद हालचाल किंवा भूत असल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. यानंतर हळूहळू ही बाब अफवाच असल्याचे स्पष्ट होऊ लागले.

Nashik News: कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा 

दरम्यान, गावात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवून गावात भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अशा खोट्या संदेशांवर आणि व्हिडीओंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

Nashik News:  एआयद्वारे फोटो,व्हिडीओ तयार केल्याचा संशय

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ हे जुने असून काही फोटो एआय (Artificial Intelligence) च्या माध्यमातून तयार करून पसरविण्यात आल्याचा संशय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत असलेला तथाकथित ‘भुताचा व्हिडीओ’ पूर्णपणे असत्य आणि दिशाभूल करणारा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलाही संशयास्पद मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये. अशा प्रकारच्या अफवा समाजात भीती पसरवण्यास कारणीभूत ठरतात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ

Malegaon Mayor Election 2026: मोठी बातमी : मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच भयंकर घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली, इस्लाम पार्टीचे नेते थोडक्यात वाचले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: खिडकीला दोर बांधून कोणी फास लावेल का? डॉ. मनीषा जेजुरकरांच्या बहिणीचा सवाल, निलेश जेजुरकरांशी अफेअर असणारी महिला डॉक्टर गोत्यात येणार
खिडकीला दोर बांधून कोणी फास लावेल का? डॉ. मनीषा जेजुरकरांच्या बहिणीचा सवाल, निलेश जेजुरकरांशी अफेअर असणारी महिला डॉक्टर गोत्यात येणार
Nashik Rangpanchami 2026: नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
नाशिकमध्ये रंगपंचमी साजरी करताना हुल्लडबाजांचा उन्माद, गोदावरी नदीपात्रात चपला-बूटं फेकली; गोदाप्रेमी आक्रमक, प्रशासनाकडे मोठी मागणी
Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं
Nashik Crime: डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, भावाकडून मनोविकारतज्ज्ञ निलेश जेजुरकरांवर गंभीर आरोप , म्हणाला, 'चर्चेसाठी बोलावलं पण...'
नाशिकमध्ये माईंड क्लिनिक चालवणाऱ्या डॉ. निलेश जेजुरकरांच्या पत्नीने आयुष्य संपवलं, भावाचे गंभीर आरोप, म्हणाला...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget