Nashik News: नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे (Potholes) अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गत 20 जुलै रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर (Nashik-Trimbakeshwar Road) झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले दिलीप काळे यांची 24 दिवसांची रुग्णालयातील झुंज अखेर अपयशी ठरली असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Nashik News: रिक्षाची वाट पाहताना भरधाव दुचाकीची धडक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी दिलीप काळे हे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रिक्षाची वाट बघत उभे होते. त्याच वेळी एका भरधाव दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात काळे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्बल 24 दिवस चाललेली त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली.

Nashik News: नातेवाईकांचा प्रशासनावर आरोप

हा अपघात रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या अत्यंत दुरवस्थेमुळेच झाल्याचा गंभीर आरोप मृत दिलीप काळे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवकांनीही नातेवाईकांच्या आरोपांना पाठिंबा दर्शवत हा अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच घडल्याचा दावा केला आहे.

Nashik News: महापालिका आणि पोलिसांकडून चौकशी सुरू

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते अपघात समितीला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. हा अपघात खरोखरच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला होता की इतर काही कारणांमुळे, याचा शोध आता महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्तपणे घेतला जात आहे.

Nashik News: नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे सातवा बळी?

नाशिक शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे तब्बल 6 नाशिककरांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता चौकशी समितीच्या अहवालात दिलीप काळे यांचा अपघातही खड्ड्यांमुळेच झाल्याचे निष्पन्न झाल्यास, हा नाशिकमधील रस्ते अपघातातील सातवा बळी ठरणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासन या चौकशीअंती काय कारवाई करते, याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं