एक्स्प्लोर

Nashik News: खबरदार! नाशिकमध्ये आजपासून सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड, तिसऱ्या डोळ्याचा वाहनचालकांवर वॉच, 'या' 40 सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित

Nashik News: नाशिक शहरातील 40 वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

Nashik News: नाशिक शहरातील 40 वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही आज (दि. 20) पासून कार्यान्वित होत आहेत. यामुळे वाहतुकीचे नियम तोडणारे, बेशिस्त वाहनधारक सीसीटीव्हीमध्ये कैद होणार असून, त्यांना ई-चलनाद्वारे दंड आकारला जाणार आहे. दंडाचा मेसेज थेट मोबाइलवर येणार आहे. सिग्नल तोडणे, यूटर्न, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नेणे, ट्रिपल सीट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करावेच लागणार आहे. अन्यथा सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर वाहनधारकांवर राहणार आहे. 

शहरात सीसीटीव्ही बसविले आहेत. अद्याप ते सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले नव्हते. पोलीस आयुक्तालयाकडून यासंदर्भात स्मार्टसिटीकडे पाठपुरावा करण्यात येत होता. आगामी काळात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सीसीटीव्हीचा उपयोग करण्यात येणार आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही योग्य दृश्यमानता नसल्याने चांगल्या प्रतीचे सीसीटीव्ही बसविण्यात आले. नव्याने बसविण्यात आलेले सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित होत आहेत. याची जोडणी पोलीस नियंत्रण कक्षात देण्यात आली आहे. 

पोलीस नियंत्रण कक्षात एलसीडी वॉल उभारली असून, यावर बेशिस्त वाहनधारकांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. यासाठी वाहतूक शाखेतील अंमलदारांना सीसीटीव्हीच्या आधारे कायदेशीर कारवाई, बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईसह इ-चलनचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून टप्प्याटप्प्याने बेशिस्तांवर ई-चलन अंतर्गत कारवाई होणार आहे. नियम मोडल्यास सीसीटीव्हीद्वारे त्याची माहिती पोलिसांच्या सीसीसीमध्ये ई-स्वरूपात येईल. त्याची पडताळणी करून ई-चलनाद्वारे दंड आकारला जाईल.

Nashik News: 'या' सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित

सरकारवाडा पोलीस स्टेशन, सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, तरणतलाव, सांगली बँक, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, गंगापूर पोलीस स्टेशन, एबीबी सर्कल, सिबल हॉटेल, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, बारदान फाटा, पाइपलाइन रोड, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, भद्रकाली पोलीस स्टेशन, खडकाळी, मुंबई नाका पोलीस स्टेशन, गडकरी चौक, नागजी चौक, मुंबई नाका सर्कल, पंचवटी पोलीस स्टेशन, पेठ नाका, काट्या मारूती चौक, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल नाका, तारवाला चौफुली, नवीन मार्केट चौक, म्हसरूळ पोलिस स्टेशन, मेरी चौफुली, राऊ हॉटेल, आडगाव पोलिस स्टेशन, नांदूर नाका, मिरची चौक, सातपूर पोलिस स्टेशन, आयटीआय चौक, पपया नर्सरी, समृद्धी टी पॉइंट, महिंद्रा सर्कल, अंबड पोलिस स्टेशन, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड पोलिस स्टेशन, विहितगाव टी पॉइंट, बिटको चौक, उपनगर पोलिस स्टेशन, दत्तमंदिर

Nashik News: अशी आहे तयारी

  • पोलीस नियंत्रण कक्षात ६ बाय ४ फुटांची एलसीडी वॉल
  • 16 डबल पॅनलचे मॉनिटरचा समावेश
  • गुगल मॅपद्वारे सिग्नल्स व वाहतूक कोंडीची मिळणार सूचना
  • नियंत्रण कक्षातून मिळणार सिग्नलवर सूचना
  • सिग्नल मोडणारे, झेब्रा कॉसिंग यूटर्न घेणाऱ्यांना ई-चलनाद्वारे दंड
  • स्मार्टसिटी अंतर्गत ८०० सीसीटीव्ही
  • ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही कार्यान्वित

आणखी वाचा 

Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलीस ठाण्यात, पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले अन् फिरले तपशील समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प 
कळवण-नाशिक मार्गावर भीषण अपघात, दोन बसची समोरासमोर जोरदार धडक, वाहतूक ठप्प 
Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव? 
इराण इस्रायल युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही, द्राक्ष बागायतदार संघाची माहिती, सध्या किती मिळतोय बाजारभाव? 
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Embed widget