Nashik News: नाशिक शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, लग्नसोहळा सुरू होण्याच्या काही तास आधीच नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. गंगापूर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नाशिक (Nashik) शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

मयत वधू मुंबईतील दादर–माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ वास्तव्यास होत्या. रविवारी सकाळी त्यांचा विवाह गंगापूर गावाजवळील एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार होता. यासाठी वराकडील मंडळी मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाली होती आणि लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती.

Nashik News: नेमकं काय घडलं?

रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वधू रिसॉर्टमधील खोली क्रमांक 201 मध्ये नातेवाइकांसोबत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध अवस्थेत कोसळल्या. यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार करून श्रीगुरूजी रुग्णालयात दाखल करण्यात आलें. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Continues below advertisement

Nashik News: आनंदाचा सोहळा अंत्ययात्रेत बदलला

लग्नाचा मंडप सजलेला होता, संगीत व हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. अवघ्या काही तासांत वधू बोहल्यावर चढणार होती. मात्र मंगलाष्टक वाजण्यापूर्वीच काळाने घाला घातला. हातावर रंगलेली मेहंदी, लग्नाची साडी आणि अक्षतांची तयारी पाहून नातेवाइकांचे अश्रू अनावर झाले. ज्या ठिकाणी आनंद, हशा आणि मंगलाष्टकांचे सूर घुमणार होते, त्याच ठिकाणाहून अंत्ययात्रेची तयारी करावी लागल्याने उपस्थित प्रत्येकाचे मन सुन्न झाले.

Nashik News: अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. नववधूचे वडील ज्येष्ठ विधिज्ञ असल्याची माहिती आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नववधूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंदाचा क्षण एका क्षणात शोकात बदलल्याने ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

नंदुरबार हादरले! आश्रम शाळेतील मुलीवर मुख्यध्यापकाचा लैंगिक अत्याचार, महिला अधीक्षिकेची नराधमाला साथ; निलंबनाचे आदेश

अंगावरील सोनं पाहून नियत बदलली, मित्रांनीच काढला तृतीयपंथी मित्राचा काटा, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं