मुंबई : कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्कामुळे (Export duty On Onion) शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळं केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आज सायंकाळी पियुष गोयल यांची कांदा प्रश्नावर बैठक होत असून त्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्या, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केलं. 


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यात प्रामुख्याने कांदा प्रश्नावर (Nashik onion Issue) त्यांनी प्रकाश टाकत सरकारचे लक्ष वेधले. शरद पवार यावेळी म्हणाले की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क वाढविल्यामुळे आजची कांद्याच्या परिस्थिती ओढावली आहे. शेतकरी  (Onion Farmers) अडचणीत सापडला असून त्यातच कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आताच कांदा व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटीसाठी आले होते. त्यांच्याशी व्यापाऱ्यांच्या (onion Traders) समस्यांबाबत चर्चा केली. एकूणच कांदा प्रश्न महत्वाचा असून आजच्या बैठकीतून हा निर्णय सोडवावा अशी विनंती शरद पवार यांनी सरकारला केली आहे. 



कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावे.... 



शरद पवार पुढे म्हणाले की, आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) हे उपस्थित असणार आहेत. पीयूष गोयल यांनी कांदा प्रश्नावर आजच निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न चांगलंच पेटला असून या प्रश्नावर आज सकाळी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांना सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून आज सायंकाळी पुन्हा पियुष गोयल यांच्या उपस्थितीत या प्रश्नावर चर्चा केली आहे. तत्पर्वी शरद पवार यांनी सरकारकडे कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेण्याची विंनती केली असल्याने आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहावे लागणार आहे. 


अजित पवार काय म्हणाले? 


कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचाच शासन विचार करेल. देशातील इतर राज्यांच्या बाजारांमध्ये नाफेडमार्फत कमी दरात कांदा विक्री होत असल्यामुळे राज्यातील कांदा व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.



इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : 'मनात आलं की संप करायचा हे चालणार नाही', व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली; अब्दुल सत्तार यांची महत्त्वाची घोषणा