नाशिक : एकीकडे देशभरासह राज्यात नवरात्रीची (Navratri 2022) धूम पाहायला मिळाली. त्याचबरोबर गालबोटही लागण्याचे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गरबा (Dandiya) खेळत असताना गुजरातमध्ये एकाच दिवशी दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार घडला. दांडिया-रास खेळताना सिडकाेतील तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नवरात्रीमध्ये तरुणाईचा उत्साह एकीकडे ओसांडून वाहत असताना दुसरीकडे मात्र या हृदयविकारामुळे मृत्यूच्या घटना घडत आहेत. गुजरातमध्ये गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर नाशिक शहरात नवरात्राेत्सवानिमित्त आयाेजित दांडिया-रास खेळताना सिडकाेतील तरुणाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना गंगापूर पाेलिसांच्या हद्दीतील संत कबीरनगर परिसरात रविवारी घडली. ३६ वर्षीय रवींद्र अशोक खरे असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र हा रात्री दांडिया खेळण्यासाठी संत कबीरनगर परिसरात आला हाेता. दांडिया खेळत असताना त्याला चक्कर आली व तो खाली पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये 24 तासांत गरबा इव्हेंटमध्ये हार्ट ॲटॅकने 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अहमदाबाद, राजकोट आणि नवसारी येथेही अशीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दरम्यान आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या वयात त्याचा धोका वाढला आहे तो खूपच त्रासदायक आणि आश्चर्यकारक आहे. लोकांना अगदी लहान वयात देखील हृदयविकाराचा झटका येत आहे.
हार्ट अटॅकमागे ही कारणे
दरम्यान, गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा काय येऊ शकतो? यामागे मोठे कारण काय आहे? याबाबत आरोग्य तज्ज्ञ समीर भाटी सांगतात की, हृदयविकाराच्या झटक्यामागे अनेक प्रमुख कारणे असू शकतात. त्यांनी सांगितले की निदान हृदयाशी संबंधित कोणतेही कारण असू शकते, मेटाबॉलिक सिंड्रोम ज्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, तणाव, आहार इ. एक कारण म्हणजे आपल्या शिरा पातळ आहेत, ज्यामुळे पाश्चिमात्य लोकांपेक्षा 10 वर्षांपूर्वी भारतीयांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता वाढते. प्रदूषण आणि धूम्रपान हे देखील धोक्याचे घटक असू शकतात.
इतर महत्वाची बातमी :